SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे.. ऑस्ट्रेलियामध्ये येत्या 16 ऑक्टोबरपासून होत असलेल्या ‘आयसीसी टी-20 विश्वचषक 2022’ स्पर्धेसाठी आज (ता. 12) ‘बीसीसीआय’ने भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ स्पर्धेत उतरणार असून, केएल राहुल उपकर्णधार असेल..

नुकत्याच झालेल्या आशिया चषकात भारतीय संघाची कामगिरी फारच खराब होती. त्यामुळे ‘टी-२० वर्ल्ड कप’साठी (T20 World Cup) भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर आज दुपारी 1 वाजता मुंबईतील ‘बीसीसीआय’ मुख्यालयात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघ निवडीसाठी बैठक झाली.

Advertisement

जाडेजाच्या जागी अक्षर पटेल..

बैठकीत सलामीवीर कोण असावेत, रिषभ पंत, रवींद्र जडेजाची रिप्लेसमेंट, मोहम्मद शमी व आर. अश्विनचा समावेश आदी मुद्यांवर चर्चा झाली. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने, तो या वर्ल्ड कप स्पर्धेला मुकणार आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलची अपेक्षेप्रमाणे निवड करण्यात आली आहे..

Advertisement

भारताचा स्टार बाॅलर जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल हे दुखापतीतून सावरल्याने त्यांची संघात वापसी झाली आहे. ऋषभ पंतसह दिनेश कार्तिक या दोन्ही यष्टीरक्षक फलंदाजांना संघात स्थान मिळालं आहे. शिवाय, अर्शदीप सिंहलाही ‘लेफ्ट हँड पेसर’ म्हणून संघात स्थान मिळालं आहे.

ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. अ‍ॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये 45 सामने खेळवले जाणार आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 13 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

Advertisement

भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.

राखीव खेळाडू – मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.

Advertisement

भारतीय संघाचे सामने

  • 23 ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
  • 27 ऑक्टोबर – भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
  • 30 ऑक्टोबर – भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
  • 2 नोव्हेंबर – भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
  • 6 नोव्हेंबर – भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement