SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तुमची गरज भागवली जाईल. मनावर फार ताण घेऊ नका. भागिदारीतून चांगला नफा मिळेल. घरातील सर्वांशी मिळून-मिसळून वागावे. आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी भेट होईल. दिवस आनंदात व्यतीत कराल.

वृषभ (Taurus): औद्योगिक स्थिरता लाभेल. घरात काही महत्वाचे बदल कराल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. दिवस आनंददायी ठरेल. कोणावरही फार विसंबून राहू नका. आज तुम्ही आपला अनमोल वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.

मिथुन (Gemini) : गरज असल्यासच बाहेर पडा. जुनी देणी भागवली जातील. जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. प्रेम सौख्यात वाढ होईल. गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. मानप्रतिष्ठा भंग पावेल.

कर्क (Cancer) : तुमच्या ज्ञानात भर पडेल. निसर्ग सौंदर्याचे आकर्षण निर्माण होईल. बर्‍याच दिवसांनी जवळचे मित्र भेटतील. वरिष्ठांचा विरोध सहन करावा लागेल. बोलण्यात गोडवा ठेवावा. कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. संततीशी चर्चा होईल. घरातील सदस्यांचे सल्ले ऐका.

Advertisement



सिंह (Leo) : लिखाण करण्यास चांगला दिवस. नवीन तांत्रिक बाबींची जाणीव करून घ्यावी. मानसिक प्राबल्य वाढवावे लागेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. अनाठायी घराबाहेर पडू नका. व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल.

कन्या (Virgo) : व्यायामाला कंटाळा करू नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. नवीन उर्जेने कामे तडीस न्याल. जवळचे मित्र भेटण्याची शक्यता. सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरू शकेल.

तुळ (Libra) : उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. घरगुती वातावरण चिघळू देऊ नका. संयमाने कामे कराल. ताणतणाव, दडपणाच्या मनःस्थितीवर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तसेच तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे. जोडीदाराची काळजी घ्या.

वृश्‍चिक (Scorpio) : चैन करण्याकडे अधिक कल राहील. मुलांशी हितगुज कराल. भागीदारीत फार अवलंबून राहू नका. मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती आहे. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील.



धनु (Sagittarius) : अंगीभूत कलेला वाव द्यावा. केलेली धावपळ सार्थकी लागेल. कामे हातावेगळी केल्याचा आनंद लाभेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. वडीलधार्‍यांचा मान राखावा. घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धन आणि प्रतिष्ठेची हानी असे कृत्य करू नका. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा.

मकर (Capricorn) : विसंवादाला थारा देऊ नका. मनात कोणतेही आधी बाळगू नका. जुनी येणी प्राप्त होतील. प्रयत्नांना यश मिळेल. कौटुंबिक वातावरण तुमच्या मर्जीप्रमाणे राहील. घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल.

कुंभ (Aquarious) : कामाचा फार बोभाटा करू नका. हाताखालील लोक सहाय्यक ठरतील. प्रलोभनापासून दूर राहावे. लपवाछपवीची कामे करू नका. घरगुती खर्च वाढू शकतो. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. जिभेवर ताबा ठेवा.

मीन (Pisces) : नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र व्हाल. वादावादीच्या मुद्दयात सहभाग होऊ नका. वचन करण्यावर भर द्या. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. वरिष्ठांच्या कडून कौतुकास पात्र व्हाल. आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल.

Advertisement