SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शंभर दिवस रंगणार टास्क, राडा नि भांडणं.. बिग बाॅस ‘या’ तारखेला सुरु होणार…!!

रसिक प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय, मात्र तितकाच विवादित शो म्हणजे ‘बिग बॉस’.. सहभागी स्पर्धकांना दिली जाणारी टास्क, राडा नि भांडणं म्हणजे, बिग बाॅस.. असं असलं, तरी या शोची काही लोक आतुरतेनं वाट पाहत असतात. हिंदीपाठोपाठ मराठी ‘बिग बॉस’ हा शो लोकांच्या पसंतीस उतरला आहे..

गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी 4’ भेटीला कधी येणार, याची रसिकांना उत्सुकता लागली हाेती. मात्र, आता अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली असून, ‘बिग बॉस मराठी’चा पुढच्या सीजनची तारीख समोर आली आहे. या शोचो प्रोमो नुकताच समोर आला असून, चाहत्यांनी त्याला मोठी पसंती दिली आहे..

Advertisement

कधी सुरु होणार मराठी बिग बाॅस..?

‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीजन तुफान लोकप्रिय ठरला. त्यामुळे प्रेक्षकांना चौथ्या सीजनची प्रतीक्षा लागली होती. नुकताच या शोचा प्रोमो रिलीज झाला नि आता या शोची तारीखही समोर आली आहे. ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन येत्या 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.. यंदाही या शोचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर हेच करणार आहेत.

Advertisement

 

View this post on Instagram

 

Advertisement

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

Advertisement

‘कलर्स मराठी’ वाहिनीने नुकताच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘बिग बॉस मराठी 4’चा नवा प्रोमो शेअर केला. त्यात असं म्हटलंय, की ‘कधी एकमेकांना साथ देतात, तर कधी होतात टास्कमध्ये फेल होतात, पण बिग बाॅसच्या घरात सगळं होणार, यंदा ऑल इज वेल…’

दरम्यान, येत्या 2 ऑक्टोबरला सायंकाळी साडेसात वाजता ‘बिग बॉस मराठी’चा ग्रॅण्ड प्रीमियर होणार आहे. त्यानंतर सोमवार ते शुक्रवार रोज रात्री 10 वाजता, तसेच शनिवारी- रविवारी रात्री साडे नऊ वाजता ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर हा शो प्रेक्षपित केला जाईल. शोची तारीख जाहीर झाली असली, तरी यंदा ‘बिग बॉस’च्या घरात कोण असणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement