SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

संपूर्ण राज्यात पावसाचा अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज..

राज्याच्या विविध भागात काही दिवसांची उघडीप मिळाल्यानंतर पुन्हा पावसानं (Rain) काही भागांत हजेरी लावली आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी राज्यात अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. गणेश विसर्जनावेळी मिरवणुकीत पाऊस आल्याने काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं समजतंय.

राज्यात काही ठिकाणी सकाळी ऊन तर काही वेळातच दुपारी किंवा संध्याकाळी काही वेळेपुरता चांगला पाऊस होतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मोकळे आकाश दिसते. असा पावसाचा प्रकार काही दिवसांपासून चालूच आहे. याशिवाय कडक ऊन पडताना देखील दिसते. अशातच याच पावसामुळे मागच्या काही दिवसांपासून हवामान खात्याकडून पावसाबाबत शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

गणेश विसर्जनाच्या वेळी मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचे पाहायला मिळालं. राज्यातील अनेक भागात पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर या भागात अतिवृष्टी झाल्याने सरकारने शेतकऱ्यांना मदतही जाहीर केली आहे. आता आजसुद्धा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ओडिशा, महाराष्ट्र व दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. राज्याच्या विविध भागात विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, आजही हवामान विभागाकडून राज्यात पावासाचा इशारा देण्यात आला आहे. आजही राज्यात काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

Advertisement

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर यामुळे दक्षिण कोकणातील जिल्ह्यांत पाऊस बरसण्यास पोषक हवामान झाले आहे, यामुळे तिथे मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Update) तर उर्वरित राज्यात काळे ढग दाटून येतील आणि विजा चमकून, वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 5 दिवसांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाने सांगितले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement