SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांना 6 नव्हे, 12 हजार रुपये मिळणार…!! केंद्राप्रमाणे राज्य सरकारचीही खास योजना…

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने ‘मुख्यमंत्री किसान योजना’ (Mukhyamantri kisan yojana) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थसंकल्पात त्यासाठी विशेष तरतूद केली जाणार असल्याचे समजते..

पीएम किसान योजनेअंतर्गत लहान व सीमांन्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. वर्षातून तीन वेळा शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये वर्ग केले जातात. केंद्र सरकार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करते. आतापर्यंत 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असून, लवकरच 12 वा हप्ता दिला जाणार आहे…

Advertisement

राज्याचेही 6 हजार रुपये मिळणार…

पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ठराविक महिन्याला टप्प्या-टप्प्यानं ही रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केली जाणार आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते..

Advertisement

शेतकऱ्यांना दरवर्षी कशा पद्धतीने हे पैसे दिले जातील, तसेच राज्याच्या अर्थसंकल्पात त्यासाठी किती रकमेची तरतूद करावी लागेल, योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील की केंद्राचीच नियमावली राज्यासाठीही असणार, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. कृषी विभागाच्या बैठकीत या साऱ्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचे समजते..

दरम्यान, पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये मिळतात. त्यानंतर आता ‘मुख्यमंत्री किसान योजने’तही शेतकऱ्यांना 6 हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे केंद्राचे 6 हजार व राज्याचे 6 हजार, असे दरवर्षी एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत..

Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला तत्वतः मान्यता दिली असून, त्यानुसार विभाग पातळीवर कामही सुरु झाले आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना ‘महाराष्ट्र किसान योजने’चा लाभ होणार असून, लवकरच या प्रक्रियेला सुरवात होणार असल्याचे सांगण्यात आले..

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement