SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोहलीचे ‘विराट’ शतक, भारताचा अफगाणिस्तानवर मोठा विजय..!

भारतीय संघाने काल अफगाणिस्तानविरुद्ध (ind vs afg) खेळताना स्पर्धेचा शेवट गोड करत दणदणीत विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानवर 101 धावांनी हा विजय मिळवला आहे. भारताकडून फलंदाजी व गोलंदाजी दोन्हीमध्येही चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. प्रत्युतरात अफगाणिस्तानच्या फलंदाजांना 20 षटकांत 8 बाद 111 धावाच करता आल्या.

विराट कोहलीने 12 चौकार आणि 6 षटकार खेचत नाबाद 122 धावा करत भारतीय संघाला धावांचा मजबूत डोंगर उभारून दिला. विराट कोहलीचं ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधलं हे पहिलंच आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं 71वं शतक ठरलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं सर्वात वेगवान 24 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.

Advertisement

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भूषवणाऱ्या लोकेश राहुलनेही त्याला साथ देत 42 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत 61 धावा केल्या. सुर्यकुमार यादवने 2 चेंडूत 6 धावा आणि ऋषभ पंतने 16 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 2 बाद 212 धावांपर्यंत मजल मारली. तर भारताच्या भुवनेश्वर कुमारने 4 धावांत 5 बळी टिपत संघाला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

कोणत्या संघात कोणाचा होता समावेश:

Advertisement

भारत- लोकेश राहुल (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग

अफगाणिस्तान- हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झाद्रान, नजीबुल्ला झाद्रान, मोहम्मद नबी (कर्णधार), करीम जनात, राशिद खान, अजमतुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, फरीद अहमद मलिक, फजलहक फारुकी
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement