SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी नुकसान भरपाई मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा..!

राज्यात मागील अनेक दिवसांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. सध्या राज्यात जून ते ऑगस्ट महिन्या दरम्यान अतिवृष्टीमुळे व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप नुकसान झाले आहे.
यासाठी राज्य शासनाने काल गुरुवारी राज्यात 3 हजार 501 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळवून देण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मागणीला यश मिळाले आहे. ते म्हणाले की, राज्यातील ज्या कृषी मंडळामध्ये 24 तासात 65 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला असेल तर आणि ज्या मंडळातील गावामध्ये 33 टक्क्यांपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना राज्य सरकार नुकसान भरपाई देणार आहे. याबाबत राज्य शासनाचा निर्णय गुरुवारी (ता. 8 सप्टेंबर) रात्री काढण्यात आला.

Advertisement

येत्या 2 ते 3 दिवसांत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरूवात होईल, ही मदत तीन टप्प्यात मिळेल, असंही मंत्री सत्तार म्हणाले. जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13,600 प्रती हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहेत. ही रक्कम आधी 2 हेक्टरच्या मर्यादेत 6,800 रुपये प्रती हेक्टर एवढी होती. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 3 हेक्टरच्या मर्यादेत 27 हजार रुपये प्रती हेक्टर देण्यात येतील. बागायतसाठीची आधीची रक्कम 2 हेक्टरच्या मर्यादेत 13,500 एवढी होती.

बाधित विभागांना मदतीचे वाटप:

Advertisement

• नाशिक विभागासाठी 36 कोटी 95 लाख रुपये,
• पुणे विभागासाठी 44 कोटी 38 लाख रुपये,
• अमरावती विभागासाठी 1196 कोटी रुपये,
• औरंगाबाद विभागासाठी 1008 कोटी
• नागपूर विभाग 1156 कोटी तर
• कोकण विभाग 2.64 कोटी
👉 याप्रमाणे एकूण 3345 कोटी रुपये इतका निधी मंजूर

▪️ अहमदनगर जिल्ह्यासाठी 21,410 शेतकऱ्यांसाठी दोन कोटी 91 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे.
▪️ औरंगाबाद विभागासाठी 10 लाख 9 हजार 270 शेतकऱ्यांसाठी 1 हजार 8 कोटी 30 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे.
▪️ परभणी जिल्ह्यातील 1,557 शेतकऱ्यांसाठी एक कोटी 60 लाख रुपये. हिंगोली जिल्ह्यांमध्ये 12,370 शेतकऱ्यांसाठी 157 कोटी 4 लाख रुपये.
▪️ उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यामध्ये 75 हजार 739 शेतकऱ्यांसाठी 90 कोटी 74 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे.
▪️ नाशिक जिल्ह्यासाठी 18,467 शेतकरी 11 कोटी 24 लाख रुपये
▪️ जालना जिल्ह्यातील 6,898 शेतकऱ्यांसाठी 3.71 कोटी एवढी मदत वितरित केली जाणार आहे.
▪️ नांदेड जिल्ह्यामधील सात लाख 41 हजार 946 शेतकऱ्यांसाठी 717 कोटी 88 लाख.
▪️ लातूर जिल्ह्यामधील 49 हजार 160 शेतकऱ्यांसाठी 30 कोटी 30 लाख रुपये
▪️ धुळे जिल्ह्यामधील 4,497 शेतकऱ्यांसाठी तीन कोटी 39 लाख रुपये.
▪️ नंदुरबार जिल्ह्यामधील 877 शेतकऱ्यांसाठी 35 लाख रुपये
▪️ जळगाव जिल्ह्यामधील 11,424 शेतकऱ्यांसाठी 19.6 कोटी रुपये
👉 याशिवाय इतर पात्र जिल्ह्यांना देखील मदत वितरित केली जाणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement