SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बहुप्रतीक्षित iPhone 14 अखेर लॉंच, वाचा जबरदस्त फीचर्स..

बहुप्रतीक्षित iPhone 14 अखेर Apple कंपनीने भारतात लॉंच केला आहे. ग्राहक गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहत असताना कंपनीने काल दिमाखात लॉंचिंग इव्हेंटमध्ये आयफोन सादर केला. ॲपल 14 ची किंमत 799 डॉलर्स तर ॲपल 14 प्लसची किंमत 899 डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे.

iPhone 14 च्या इव्हेंट मध्ये यासह Apple Watch Series 8 आणि AirPods Pro 2 देखील लाँच करण्यात आले. आयफोनबाबत सांगायचं झालं तर ॲप्पल iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max, iPhone 14 Pro Max Ultra हे फोन लाँच झाले आहेत. तर जाणून घेऊयात काही खास फीचर्स..

Advertisement

आयफोन 14 स्पेसिफिकेशन आणि फीचर्स:

ॲपलने असा दावा केलाय की, आयफोन 14 हा सध्याचा सर्वात फास्ट फोनपैकी एक आहे. Apple iPhone 14 हा पाच कलर्समध्ये ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे, त्यात मिडनाईट, स्टारलाइट, ब्लू, पर्पल व रेड असे कलर्स असतील.

Advertisement

महत्वाचं म्हणजे गेले कित्येक दिवसांपासून चर्चेत असणारे फिचर आणि Apple ने फक्त अमेरिकेत दिल्या जाणाऱ्या iPhone 14 मध्ये सिम कार्ड स्लॉट दिलेला नाही. तर भारतासह इतर देशांमध्ये कंपनी आयफोन 14 मध्ये सिम कार्ड स्लॉट देऊ शकते.

दोन्ही आयफोन A15 बायोनिक चिपसेटसोबत उपलब्ध होतील. आयफोन 14 चा स्क्रीन डिस्प्ले 6.1 इंच तर आयफोन 14 प्लसचा स्क्रीन डिस्प्ले 6.7 इंचाचा दिला आहे.

Advertisement

आयफोन 14 चा फ्रंट कॅमेरा आणि मेन कॅमेरा 12MP चा मिळणार आहे. कंपनीने मोठा आणि फास्ट सेन्सर असल्याचा दावा या आयफोनबाबत केलाय.

नवीन फोन 5जी आणि ई-सीमसोबत उपलब्ध आहे. कार क्रॅश डिटेक्शन फीचर मिळणार आहे.

Advertisement

आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस आयफोनमध्ये सर्वोत्तम बॅटरी लाइफ मिळेल. हे दोन्ही फोन A15 बायोनिक चिपवर चालतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement