SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या आयुष्यावर चित्रपट येणार, ‘या’ अभिनेत्याने केली मोठी घोषणा..

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) नुकतेच दिग्दर्शक म्हणून चंद्रमुखी आणि धर्मवीर चित्रपटातून मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत लोकांसमोर येऊन दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडून गावागावांत पोहोचला आहे. आता ते आणखी एक चित्रपट आणण्याची तयारी करत आहेत. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत काही वर्षे गाजवणारे दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावरील चित्रपट येणार असल्याचं सांगितलं आहे.

प्रसाद ओक आपल्या अनोख्या शैलीचे दर्शन नेहमीच घडवत असतात. सध्या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चंद्रमुखी चित्रपटातील ‘चंद्रा’ गाणं अतिशय लोकप्रिय होत आहे. आता मराठी सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या आयुष्यावर आधारित एक शानदार बायोपिक येणार आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांचे आता छानपैकी मनोरंजन होणार आहे, हे नक्की!

Advertisement

दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर येणाऱ्या या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्याची प्रमुख भूमिका आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कुमार तवरामी या सिनेमाचे निर्माते आहेत. तर किरण यज्ञ्योपवीत हे या सिनेमाचं लेखन करत आहे. तर प्रसाद ओक स्वत: या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून एका मुलाखतीमध्ये चित्रपटाबाबत घोषणा मराठीतील नामवंत दिग्दर्शक प्रसाद ओक याने केली आहे.

प्रसाद ओक पुढे अधिक माहीती देताना म्हणाला, ‘मला असं वाटतं की गणपती बाप्पानंच मला एवढे वर्ष थांबवलं असेल. तो म्हणाला असेल तुला थांबवलं आहे एवढे वर्ष पण जेव्हा तुझी वेळ येईन तेव्हा मात्र मी तुला दोन्ही गोष्टी देईन. असे दोन्ही आशिर्वाद बाप्पानं मला या वर्षात दिले. आता मी निळू फुले यांच्यावर आधारित सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे आणि या रुपात हा तिसरा आशिर्वाद बाप्पानं मला या वर्षी दिला आहे”, असं तो म्हणाला.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement