SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आज भारत विरुद्ध श्रीलंका सामना, कधी व कुठे पाहता येणार, वाचा..

आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मधील भारत विरुद्ध श्रीलंका (Ind vs SL) यांच्यात टी-20 सामन्याला आज मंगळवारी 7.30 वाजता सुरुवात होणार असून भारताला अजून 2 मोठ्या विजयाची गरज आहे. आज श्रीलंकेविरुद्ध भारताची लढत असून आजच्या सामन्यात भारताला अनुभवी गोलंदाजांवर जबाबदारी टाकावी लागेल. याशिवाय फलंदाजीमध्ये खूप पर्याय असले तरी सलामीच्या जोडीचं गणित थोडं कच्चं झालं आहे. मजबूत भागीदारीची सध्या गरज असल्याने हा तिढा भारताला सोडवावा लागणार आहे.

आजच्या एकमेकांना असणाऱ्या तगड्या आव्हानाचा भारत व श्रीलंका या संघांना सामना करावा लागणार आहे. हा सामना भारतीयांना आज (ता. 6 सप्टेंबर) संध्याकाळी डिज्नी हॉटस्टार (Disney Hotstar) तसेच सोनी लीव्हवर (Sony LIV) पाहता येईल तसेच टीव्हीवर या सामन्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर पाहता येणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Stadium) हा सामना खेळवला जाणार असून या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Advertisement

सुपर-4 साठी होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक :

▪️ भारत Vs श्रीलंका – 6 सप्टेंबर
▪️ पाकिस्तान Vs अफगाणिस्तान – 7 सप्टेंबर
▪️ भारत Vs अफगाणिस्तान – 8 सप्टेंबर
▪️ श्रीलंका Vs पाकिस्तान – 9 सप्टेंबर

Advertisement

पंतऐववजी कार्तिक, जडेजा-अक्षर दोघांना संधी?

भारताला आज दिनेश कार्तिकसारख्या आयपीएल गाजवणाऱ्या आणि झटपट धावा काढणाऱ्या फिनिशर फलंदाजाला आशिया चषकात पूर्ण संधी दिली गेली नाही. याशिवाय भारतीय संघ वेगवेगळ्या खेळाडूंना संधी देत नवीन प्रयोग करत आहे. पण युवा खेळाडूंना यामुळे अनुभव मिळण्यास अडचण येते आणि मैदानावर युवा गोलंदाजांना गोलंदाजी करण्यासाठी पिचचा अंदाज न आल्याने समस्या येते. यामुळे अनुभवी गोलंदाज आज एखादा वाढू शकतो.

Advertisement

भारत-पाकिस्तान सामन्यात ऋषभ पंतने खास कामगिरी न केल्याने आता दिनेश कार्तिक एक चांगला पर्याय ठरू शकतो, म्हणून संधी दिली जाऊ शकते. रवींद्र जडेजा सोबतच अक्षर पटेलला अष्टपैलू म्हणून संधी मिळू शकते का, याशिवाय हर्षल पटेलला संधी मिळतेय का हे पाहावं लागणार आहे. याशिवाय चहलची जागा अश्विनला दिली तर संघामध्ये फिरकीपटूंमध्ये विविधता आणि अनुभव कामाला येईल. आता मैदानावर अंतिम संघ दिसेल तेव्हाच टीम इंडिया आज किती मजबूत स्थितीत असेल, हवं समजेल.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement