SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चित्रपटगृहांत 75 रुपयांत चित्रपट पाहता येणार, ‘या’ दिवशी मिळणार मोठी सूट..

बॉलिवूड, हॉलीवूड चित्रपटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आपल्यापैकी काही लोक प्रत्येक आठवड्याला येणाऱ्या नवीन चित्रपटाचा आनंद घेत असतात. कोणताही नवा चित्रपट आला की तुमचे मित्र-मैत्रिणी, फॅमिली, ऑफिसचे सहकारी सुट्टीच्या दिवशी जाण्याचा वा इतर दिवशी चितपट पाहण्याचा प्लॅन बनवत असतात आणि दोन-पाच हजार रुपयांचा चुराडा एका दिवसांत करतात.

जर तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी असेच पैसे खर्च करावे लागत असतील. तर आज आम्ही तुम्हाला असं काही सांगणार आहोत की किमान एक दिवस तुमच्या या खर्चाला जास्तीत जास्त आला बसू शकेल. कारण मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (MAI) एक मोठी घोषणा केली आहे. त्यामध्ये देशातील 4000 स्क्रीन्सवर अत्यल्प दरात तुम्हाला तिकीट उपलब्ध होणार आहे.

Advertisement

मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने ट्विट करून माहीती दिली की..

16 सप्टेंबर हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय चित्रपट दिवस’ (National Cinema Day) म्हणून साजरा करणार असल्या कारणाने या दिवशी फक्त 75 रुपयांत तुम्हाला तिकीट खरेदी करता येणार आहे. पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, सिटीप्राइड अशा अनेक ठिकाणी तिकीटांची किंमत 200-400 रुपये किंवा त्याहूनही अधिक आहे. पुन्हा तिथे काही खाण्यासाठी घेतले किंवा थंड पेये, पॉपकॉर्न वगैरे घेतले तर हजार रुपये एका व्यक्तीस खर्च होण्यास वेळ लागत नाही.

Advertisement

‘राष्ट्रीय चित्रपट दिवस’ साजरा करण्याच्या हेतूने 16 सप्टेंबर या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणारे सिनेमेदेखील प्रेक्षकांना 75 रुपयांतच पाहायला मिळणार आहेत. आता ‘राष्ट्रीय सिनेमा दिनी’ 4000 स्क्रीन्सवर प्रेक्षकांना 75 रुपयांत सिनेमा पाहता येणार असल्याने तुमचे तिकिटाचे पैसे या एका दिवशी मात्र वाचणार आहेत. एमएआयने दिलेल्या माहितीनुसार,”सर्व वयोगटातील मंडळींना एकत्र एकादिवशी सिनेमा पाहता यावा यासाठी हा खास निर्णय घेतला गेला आहे.

एमएआयचे अध्यक्ष कमल ज्ञानचंदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, सिटीप्राइड अशा सर्व सिनेमागृहांमध्ये 16 सप्टेंबरला 75 रुपयांत सिनेमे पाहायला मिळणार आहेत. तर 16 सप्टेंबर या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणारे सिनेमेदेखील प्रेक्षकांना 75 रुपयांतच पाहायला मिळणार आहेत. कोरोनामुळे अनेकांनी सिनेमागृहांकडे पाठ फिरवली होती. पण आता 16 सप्टेंबरला पुन्हा एकदा अनेक सिनेमागृहे हाऊसफुल्ल होऊ शकतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement