SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पाकिस्तान विरुद्ध मॅचपूर्वी भारताला आणखी एक धक्का, टीम इंडियात होणार ‘हे’ बदल..!!

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज (ता. 4) पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकचा दणदणीत पराभव केला होता. त्यानंतर ‘सुपर-4’ मध्ये हे दोन्ही संघ पुन्हा एकदा भिडणार आहेत. दोन्ही संघांतील खेळाडूंना दुखापतींनी घेरले असून, या सामन्यात अनेक बदल दिसू शकतात..

आजच्या ‘हाय होल्टेज’ सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज होत असतानाच, भारताचा दिग्गज अष्टपैलू रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे आशिया चषकातूनच बाहेर झालाय. त्यानंतर टीम इंडियाला पुन्हा मोठा धक्का बसला असून, वेगवान गोलंदाज आवेश खान याला ‘व्हायरल फिव्हर’ झालाय.. त्यामुळे त्याला ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

Advertisement

भारतीय संघ दुखापतींनी बेजार झालेला असताना, पाकिस्तान संघालाही धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आशिया कप सुरु होण्यापूर्वीच दुखापतींमुळे स्पर्धेबाहेर झाला. त्यानंतर भारताविरुद्ध पहिल्या सामन्यात अखेरच्या षटकात फटकेबाजी करणारा खेळाडू शाहनवाज दहानीही दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे..

भारतीय संघातील बदल..?

Advertisement

अष्टपैलू रवींद्र जाडेजाच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेल याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात त्याला खेळवण्याची शक्यता कमीच आहे. जाडेजाच्या जागी हार्दिक पंड्याची निवड केली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

आजारी आवेश खानच्या जागी भारतीय संघात आता दीपक चहरला संधी दिली जाऊ शकते.. गेल्या दोन सामन्यांत आवेश खूप महागडाही ठरला होता. त्यामुळे त्याच्या जागी दीपक चांगला पर्याय ठरु शकतो. शिवाय, तो एक चांगला स्विंग गोलंदाज असून, उपयुक्त फलंदाजीही करू शकतो.

Advertisement

आवेश बरोबरच वेगवान बाॅलर अर्शदीप सिंगही चांगलाच महागडा ठरताना दिसतोय. त्यामुळे त्याच्या जागी फिरकी बाॅलर आर. अश्विन किंवा दीपक हुडा यांची निवड होऊ शकते. अश्विनकडे चांगला अनुभव आहे, तर दीपक हुडा काही दिवसांपासून फॉर्ममध्ये आहे. या दोघांपैकी कोणाला संधी मिळते, हे पाहावे लागणार आहे..

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement