SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सप्टेंबरमधील पावसाचा अंदाज जाहीर, हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना इशारा..

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसानं जोर धरलाय. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी जोरदार जलधारा कोसळत आहेत. विशेषत: नाशिक व अहमदनगर जिल्ह्याला मुसळदार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढलंय. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यांतील पावसाचा अंदाज जाहीर केला आहे..

मोसमी पावसाच्या शेवटच्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. संपूर्ण देशात या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 109 टक्के पाऊस होईल, असे भारतीय हवामान विभागाने जाहीर केलं आहे.

Advertisement

‘या’ जिल्ह्यांना इशारा

सप्टेंबर महिन्यात मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, पूर्व विदर्भात शेवटच्या टप्प्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Advertisement

सप्टेंबरमध्ये अखेरच्या टप्प्यात देशातील बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. प्रशांत महासागरात ‘ला नीना’ वादळाची स्थिती कायम आहे. त्यामुळे या काळात देशात 109 टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

देशाच्या बहुतांश भागात सप्टेंबरमध्ये दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या जवळ किंवा त्यापेक्षाही कमी राहण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भागासह दक्षिण-पूर्व राज्यांमध्ये काही भागातच तापमानात वाढ दिसून येईल. त्यामुळे देशाचा पूर्वोत्तर भाग आणि पश्चिम-उत्तर राज्यांमध्ये या महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात सौम्य हवामानाचा परिणाम दिसत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालीय. पुढील दोन दिवस (ता. 4 सप्टेंबर) काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतीची कामे उरकण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे..

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement