SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारताचा ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू झाला ‘एंटरपोल एजंट’, फिल्मच्या ट्रेलरवर प्रेक्षक फिदा…

आपल्या अप्रतिम स्विंग गोलंदाजीने भल्या भल्या बॅट्समनच्या दांड्या गुल करणारा, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आता मोठा पडदा गाजवण्यासाठी येत आहे. इरफान पठाण आता अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावणार आहे.

खरं तर बाॅलिवूड व क्रिकेट म्हणजे, भारतीय रसिकांचे विक पाॅंईट.. खेळाडू असो की कलाकार, भारतीय चाहते त्याला डोक्यावर घेतात. त्यामुळे अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी अभिनयात हात आजमावून पाहिला आहे. अर्थात, त्यात काेणालाही फारसं यश मिळालेलं नाही. मात्र, आता या यादीत पठाणचाही समावेश झाला आहे..

Advertisement

‘कोब्रा’तून भेटीला येणार..

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून इरफान पठाण हा काॅमेन्ट्री करताना दिसतो.. शिवाय, सोशल मीडियावरही ते बऱ्यापैकी अॅक्टिव असतो.. आता तो आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करीत आहे. ‘कोब्रा’ नावाच्या चित्रपटातून इरफान पठाण अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे..

Advertisement

पठाणच्या या नव्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, त्यात तो फुल्ल अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. एका इंटरपोल एजंटच्या भूमिकेत तो दिसत आहे. चित्रपटाचा नायक नसला, तरी ट्रेलरमध्ये तो 6 पेक्षा जास्त वेळा दिसला. या चित्रपटात त्याची खास भूमिका असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

अजय ग्यानमुथु दिग्दर्शित ‘कोब्रा’ हा एक तमिळ चित्रपट असून, त्यात मुख्य नायक चियान विक्रम आहे. ट्रेलरमध्ये इरफान आपल्या एन्ट्रीलाच छाप सोडताना दिसला. त्याचा वेगळा लूक प्रेक्षकांना आवडल्याचे दिसत आहे. क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर मोठ्या पडद्यावरही अधिराज्य गाजवण्यास इरफान सज्ज झाल्याचे दिसत आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement