SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

67वा फिल्मफेअर अवॉर्ड्स: ‘हा’ चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट, मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचाही जलवा..

भारतीय चित्रपटसृष्टीतील फिल्मफेअर पुरस्कार हा एक मोठा पुरस्कार आहे. चित्रपट उद्योगातील कलाकार आणि तंत्रज्ञ या दोघांच्या मेहनतीचं कौतुक इथं होत असतं. या सोहळ्यात केले जाते. हा बहुप्रतिक्षित 67वा फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Awards) सोहळा मुंबईत (Mumbai) काल पार पडला आहे.

सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरने केले. सोहळ्यात विकी कौशलची भूमिका असलेल्या ‘सरदार उधम सिंग’ चित्रपटाने बेस्ट एक्शन, बेस्ट बॅकग्राऊंट आणि बेस्ट व्हिएफएक्स पुरस्कार पटकावला आहे.

Advertisement

▪️ बेस्ट ॲक्टर: रणवीर सिंग (83)
▪️ बेस्ट ॲक्ट्रेस : क्रीती सेनन (मिमी)
▪️ बेस्ट ॲक्टर (Critics’ Choice): विकी कौशल
▪️ बेस्ट ॲक्ट्रेस (Critics’ Choice) : विद्या बालन
▪️ बेस्ट ॲक्टर (सपोर्टींग रोल फिमेल): सई ताम्हणकर
▪️ बेस्ट ॲक्टर (सपोर्टींग रोल मेल): पंकज त्रिपाठी
▪️ उत्कृष्ट चित्रपट: शेरशाह

▪️ असिस कौरला उत्कृष्ट पार्श्वगायकाचा शेरशहा चित्रपटातील ‘रातां लम्बिया’ या गाण्यासाठी पुरस्कार मिळाला आहे.

Advertisement

▪️ सुभाष घई यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

▪️ उत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) पुरस्कार बी प्राकला शेरशहामधील ‘मन भारिया’ या गाण्यासाठी दिला गेला.

Advertisement

▪️ उत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार कौसर मुनीर यांना चित्रपट 83 मधील ‘लेहरा दो’ गाण्यासाठी प्रदान करण्यात आला. पहिल्यांदाच एका महिला गीतकाराला फिल्मफेअरचा पुरस्कार दिला गेला आहे.

▪️ उत्कृष्ट संगीत अल्बमचा पुरस्कार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणींची भूमिका असलेल्या शेरशहाला मिळाला.

Advertisement

▪️ चित्रपट विश्वातील पदार्पणासाठी बेस्ट डेब्यू पुरस्कार सीमा पहवा यांनी ‘रामप्रसाद की तेहरवी’साठी देण्यात आला आहे.

▪️ शर्वरी वाघला बेस्ट डेब्यू फिमेल पुरस्कार बंटी और बबली 2 यासाठी देण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान नुकतेच कॅनडामधील एका शहरातील रस्त्याला प्रसिद्ध संगीतकार, गायक ए. आर. रहमानचे नाव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही 2013 मध्ये कॅनडाच्या एका रस्त्याला रहमानचं नाव देण्यात आलं होतं. आता पुन्हा 2022 मध्ये सिटी ऑफ मारखमच्या महापौरांनी रहमानला हा सन्मान दिला असून नुकताच यासाठी एक सोहळा कॅनडा येथे आयोजित करण्यात आला होता. याच सोहळ्याचे काही फोटोज त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत ही बातमी दिली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement