SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पंत – उर्वशीमध्ये पुन्हा ‘पोस्ट वाॅर’..! उर्वशीच्या ‘या’ पोस्टमुळे खळबळ…

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातील स्टार विकेट किपर, बॅट्समन ऋषभ पंत व अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.. सोशल मीडियावर या दोघांमध्ये नुकतीच जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली होती. अर्थात, नंतर दोघांनीही त्यांच्या ‘पोस्ट’ डिलिट केल्या..

आता सारं काही व्यवस्थित झालंय, असं वाटत असतानाच, पुन्हा एकदा या दोघांतील वाद उफाळून आलाय. उर्वशीनं नुकतीच सोशल मीडियावर एक ‘पोस्ट’ शेअर केली असून, त्यातून तिनं पुन्हा ऋषभला डिवचल्याचे दिसत आहे..

Advertisement

‘तुझी इज्जत वाचवलीय…!’

आपल्या ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंटवर उर्वशीनं पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ती फोटोशूट करताना दिसतेय, त्याखाली तिनं कॅप्शन दिलंय.. तिच्या व्हिडीओवर नव्हे, तर खाली दिलेल्या कॅप्शनने लोकांचे लक्ष वेधून घेतलंय. उर्वशीनं ही पोस्ट पंतसाठीच लिहिल्याचं बोललं जात आहे.

Advertisement

 

View this post on Instagram

 

Advertisement

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

Advertisement

आपल्या पोस्टमध्ये उर्वशी म्हणते, की ‘मी माझी बाजू न मांडता तुझी इज्जत वाचवलीय…!’ उर्वशीने या पोस्टमध्ये थेट पंतचे नाव घेतलेलं नसलं, तरी तिनं ही पोस्ट पंतसाठीच लिहिल्याचे म्हटलं जातंय. आता त्यावर ऋषभ पंत काही प्रतित्तुर देणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे..

दरम्यान काही दिवसांपूर्वी उर्वशीने एका मुलाखतीत ‘आरपी’ नावाची व्यक्तीने तिच्यासाठी बराच काळ वाट पाहिल्याचे सांगितले होते. त्याला पंतनेही सोशल मीडियावर पोस्ट करताना उत्तर देताना, आपला पाठलाग सोड, असं म्हटलं.. त्यावर उर्वशीनं ‘छोटू भैय्या, तू बॅट बॉलच खेळ..’ असं सांगितलं.

Advertisement

काही दिवस सारं काही शांत झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा उर्वशीने नवीन पोस्ट शेअर केल्याने त्यांच्यातील वाद मिटला नसल्याचेच दिसतंय.. उर्वशीच्या या पोस्टवर आता ऋषभ काय प्रतिक्रिया देताेय, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलं आहे..

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement