SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांसाठी फायद्याची बातमी, ‘ही’ यंत्रे-अवजारे वापराल तर लागेल कमी कष्ट..

भारत हा कृषिप्रधान (Indian Agriculture) देश असून आपल्याकडे अनेक लोक आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी जशी शेती शिकवली आणि पिकवली त्याप्रमाणे आपणही शेती करण्याचं शिकलो. पण बदलत्या काळानुसार देशातील कृषी संबंधित कंपन्यांनी किंवा कृषी विद्यापीठ मध्ये संशोधन होते गेले आणि नवनवीन यंत्रे-अवजारे आपल्याला समजायला लागले.

आता अनेक शेतकरी यंत्रे, अवजारे, ट्रॅक्टर, नांगर असं कित्येक काही खरेदी करून कमी वेळेत शेतातील कामे करून आपले उत्पन्न वाढवत आहेत. काही यंत्रे व अवजारे घरी वापरण्यासाठी महिला व पुरुषांना दोघांना वापरण्यास सोपे जाईल असे आहेत. मशागतीपासून ते पीक उत्पादन (Crop Production) निघेपर्यंतच्या कामांत महिलांचा देखील सहभाग असतो. चला जाणून घेऊ काही यंत्रे किंवा अवजारांबद्दल..

Advertisement

1) हात कोळपे: आपल्या शेतात तण (गवत) काढण्यासाठी आपण खुरप्याचा वापर करत असतो. पण साधारणतः गावाकडे महिलांच्या अनेक टोळ्या खुरपणीची कामे घेतात. पण बराच वेळ अवघडलेल्या स्थितीत बसून त्यांनाही गुडघे, कमरेचा, मानेचा आणि पाठीचा त्रास होतो. यातून सुटका करण्यासाठी आपण हात कोळपे हे यंत्र वापरू शकतो. जे आपल्याला कमी किंमतीतच खरेदी करता येईल. कोळप्याने तुम्हाला कोळपणी, निंदणी, खुरपणी अशी अति श्रमाची कामे ते वजनाने हलके असल्याने सहजरित्या व कमी वेळेत करता येतील.

2) सरी-वरंबा पाडण्याचे यंत्र: जुन्या काळापासूम जसे आपण शेती करत आहोत तशीच पारंपारिक पद्धतीने फावड्याने माती ओढून आजदेखील सरी व वरंबे पाडले जातात. जास्त वेळ लागणाऱ्या या कामामुळे कंबरदुखी, पाठदुखी जास्त होते. म्हणून तुम्ही सरी-वरंबा पाडण्याचे यंत्र
घरी आणू शकता. त्याच्या वापरासाठी फक्त दोन जणांची गरज लागेल. एका महिलेने/पुरुषाने पुढे ओढले व दुसऱ्या बाजूला एका व्यक्तीने अवजारावर हात ठेवून भार दिल्यास चांगल्या पद्धतीने सरी पाडता येईल. मिरची, आले, पालक, मेथी इत्यादी पालेभाज्यांच्या लागवडीसाठी हे अवजार जास्त उपयोगी ठरते.

Advertisement

3) कडबा कुट्टी यंत्र: कडबा कुट्टी यंत्राच्या मदतीने तुम्ही कडबा, वैरण किंवा हत्ती गवताचे बारीक-बारीक तुकडे करू शकता. या कामामध्ये जास्तीत जास्त दोन जणांची गरज लागते. एक जण चाकामध्ये चारा घालण्यासाठी आणि दुसरीकडे एक व्यक्ती चाक फिरविण्यासाठी लागेल, अशी कामे असतील.

4) ऊस पाचट गोळा करण्याचे यंत्र: आपण आपल्या शेतातील ऊस काढला असेल आणि पाचट गोळा करायचे असेल तर ऊसतोडणी झाली की पाचट गोळा करण्यासाठी आपण मजूर बोलावतो किंवा आपण स्वतः ते काम करतो. पण शेत मोठं असेल तर वेळ जास्त लागेल. जर तुम्ही पाचट गोळा करण्यासाठी काम सुरू केलं तर जास्त वेळ जाईल पण एका हेक्टरमध्ये पाचट गोळा करण्यासाठी पाचट गोळा करण्याचे यंत्र वापरले तर कमी वेळेत जास्त पाचट गोळा करता येणे शक्य आहे.

Advertisement

5) भुईमूग फोडणी यंत्र: शेतकरी अनेक वर्षांपासून शेतातील भुईमूग काढणी झाल्यावर घरातील अनेक जण ते हाताने फोडतात आणि शेंगदाणे काढून ते पोत्यांमध्ये भरतात. या पारंपारिक पद्धतीने भुईमूग शेंगा हाताने किंवा दगडाने देखील फोडल्या जात असतात. पण हाताला इजा नको म्हणून तुम्ही शेंगा फोडणी यंत्र आणू शकतात. त्यात शेंगा टाकल्यानंतर दांडीच्या साह्याने आतील दातेरी कास्टिंग हलवली जाते. कास्टिंग व जाळीमध्ये शेंगा आल्या की फुटल्या जातात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement