SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हृतिक रोशन-सैफ अली खान दिसणार ॲक्शन मूडमध्ये, ‘या’ सिनेमाचा धमाकेदार टिझर प्रदर्शित..

बहुप्रतिक्षित ‘विक्रम वेधा’ सिनेमाचा (Vikram Vedha Movie Teaser) टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) ‘वेधा’ म्हणून आहे, तर सैफ अली खानने (Saif Ali Khan) ‘विक्रम’ हे पात्र साकारलं आहे. मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्शन सीक्वेन्स, आकर्षक पार्श्वसंगीत आणि नाट्यमय दृश्य सिनेमात असणार आहेत.

‘विक्रम वेधा’ सिनेमाचा टिझर हा 1 मिनिट 46 सेकंदांचा असून यामध्ये हृतिक रोशन व्हीलनच्या भूमिकेत दाखवला आहे. दरम्यान आता चित्रपटाच्या टीजरने आणखी उत्सुकता वाढवली आहे. युट्युबवर ‘विक्रम वेधा’ चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. रिलीज झाल्यानंतर पुढील फक्त 20 मिनिटांतच साडे 4 लाख लोकांनी हा टीजर पाहिला आहे. हृतिक कुर्ता आणि सन ग्लासेसमध्ये व्हीलनच्या भूमिकेत डॅशिंग दिसत आहे तर पोलिसांच्या अवतारातील सैफचा इंटेन्स लुकही जबरदस्त आहे.

Advertisement

हृतिक रोशन व सैफ अली खान यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. वेधा आपली कथा सांगत असताना कहानी वेगळ्या आणि रोमांचक वळणावर जाऊन पोहोचते. वेधा विविध पैलू उलगडत जातो आणि सिनेमातील विक्रम पात्र साकारणाऱ्या सैफ अली खानला वास्तवतेचे दर्शन घडते असं दिसतं. आता हृतिक आणि सैफ यांची जोडी पडद्यावर काय कमाल करते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Advertisement

अधिक माहीती सांगायची झाली तर मोठ्या पडद्यावर 30 सप्टेंबर 2022 रोजी प्रेक्षकांना हा या सिनेमाचा आनंद घेता येणार आहे. ‘विक्रम वेधा’ या अ‍ॅक्शन-थ्रिलरचे लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केले आहे. तामिळ चित्रपट आर माधवन आणि विजय सेतुपथीच्या अभिनयाने 2017 साली रिलीज झाला होता, आता बॉलिवूडच्या या सिनेमाचा थ्रिलर टीजर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement