SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भाजपच्या महिला नेत्याचे निधन, देशभर ‘या’ गोष्टींमुळे होत्या चर्चेत..!

भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. सोनाली फोगट या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या उपाध्यक्षा होत्या. गोव्याला फिरायला गेल्या असताना सोमवारी रात्री गोव्यात त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले (Sonali Phogat Passed Away) अशी माहिती समोर आली आहे.

सोनाली फोगट या काही कर्मचाऱ्यांसह गोव्याला गेल्या होत्या. टिकटॉक स्टार राहिलेल्या सोनाली फोगाट यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. तसेच कुलदीप बिश्नोई यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. सोनाली फोगाट यांनी सुरुवातीच्या काळात आपल्या करिअरची सुरुवात 2006मध्ये दूरदर्शनमध्ये अँकरिंग करण्यापासून तसेच मॉडेलिंग करत कारकिर्दीची सुरुवात केली होती.

Advertisement

अँकरिंग, मॉडेलिंग आणि राजकारणाव्यतिरिक्त सोनाली फोगटने पंजाबी आणि हरियाणवी चित्रपट, म्युझिक व्हिडिओ देखील केले आहेत. त्यानंतर त्या टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या. दरम्यान, 2019 मध्ये भाजपात प्रवेश करून आदमपूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई विरुद्ध आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळातही त्यांची चर्चा सुरू झाली होती. यामुळे त्या देशभर चर्चेत राहिल्या आहेत.

भाजपाने त्यांच्याकडे आदिवासी भागात काम करण्याची जबाबदारी सोपवली होती. दरम्यान, आज गोव्यामध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं. सोनाली यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सोनाली फोगटने सोमवारी रात्रीच इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. टिकटॉकसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध असलेल्या सोनालीने बिग बॉस च्या 14 व्या सिझनमध्ये देखील भाग घेतला होता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement