SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ठाकरे गटाला दिलासा..!! राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय…

राज्यातील सत्तासंघर्ष गेल्या काही दिवसांपासून सुप्रिम कोर्टात सुरु आहे.. या वादावरील सुनावणी सातत्याने पुढे ढकलली जात होती. याबाबत शिवसेनेनं सरन्यायाधीशांकडे विनंती केल्यानंतर अखेर या प्रकरणावर आज सुनावणी घेण्यात आली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.

खंडपीठाने शिवसेनेची बाजू ऐकूण घेतली. त्यानंतर आता हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.. आता या प्रकरणावर दोन दिवसांनी (गुरुवारी, 25 ऑगस्ट) घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणुकापूर्वी प्रतिकात्मक मुद्यावर न्यायालयाची तोपर्यंत स्थगिती दिली आहे.

Advertisement

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर यापूर्वी 3 व 4 ऑगस्टला सलग दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यानंतर सातत्यानं ‘तारीख पे तारीख’ सुरु होतं.. त्यामुळे शिवसेनेसमाेरील अडचणी वाढत चालल्या होत्या.. आजही ही सुनावणी होते की नाही, अशी स्थिती असताना, शिवसेनेनं तातडीनं सुप्रिम कोर्टात मेन्शन करण्यात आलं. अखेर या प्रकरणावर सुनावणी झाली.

प्रकरण घटनापीठाकडे वर्ग

Advertisement

सुप्रिम कोर्टाने शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला असून, या घटनापीठासमोरच येत्या 25 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. शिवसेना व शिंदे गटाने दाखल केलेल्या विविध याचिकांवर आता घटनापीठ निर्णय घेणार आहे.. तसेच, निवडणूक आयोगाचीही जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते.

सरन्यायाधीश रमण्णा येत्या 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत.. मात्र, त्याआधीच ते घटनापीठ स्थापन करण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश रमण्णा हे निवृत्त होत असल्याने 25 ऑगस्ट रोजी या प्रकरणावर निर्णय येणार की या प्रकरणावरील निर्णय लांबणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. घटनापीठाचा निर्णय हा देशासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement