SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यातील सत्तासंघर्षावर ‘तारीख पे तारीख’.., सुप्रिम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर…!!

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आजची (ता. 22) सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे.. यापूर्वीही तीन वेळा ही सुनावणी पुढे ढकलली आहे. 4 ऑगस्टला या प्रकरणावर सुनावणी झाली. त्यानंतर 8 ऑगस्टला होणारी सुनावणी 12 ऑगस्टवर गेली. नंतर 12 ऑगस्टवरुन ती थेट 22 ऑगस्टला ठेवली गेली. आता पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर गेलीय.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील सत्ता संघर्षाची लढाई सुप्रिम कोर्टात सुरु आहे.. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर सुप्रिम कोर्टात ‘तारीख पे तारीख’ सुरु आहे.. आज दुपारी यादीत समाविष्ट असलेली सुनावणी अचानक बदलण्यात आली आहे.

Advertisement

न्यायमूर्ती उपलब्ध नाहीत..

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीस खंडपीठापुढे या प्रकरणावर सुनावणी होत आहे.. मात्र, त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही सुनावणी पुन्हा लांबणीवर गेल्याचे सांगितले जात आहे. ही सुनावणी कधी होणार हे स्पष्ट झालेले नसले, तरी आता या प्रकरणावर मंगळवारी (ता. 23) सुनावणी होऊ शकते.

Advertisement

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षावर सातत्याने सुनावणी लांबत असल्याने ठाकरे गटासमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. ‘शिवसेना कुणाची’ या मुद्द्यावर निवडणूक आयोगातही कार्यवाही सुरु झाली आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ठाकरे गटानं चार आठवड्यांचा वेळ मागितला, पण आयोगानं दोन आठवड्यांचाच वेळ दिला. त्याची मुदत 23 ऑगस्टपर्यंत आहे.

सरन्यायाधीश रमणा हे येत्या 26 ऑगस्टला निवृत्त होत आहेत. त्यानंतर उदय लळीत यांची ‘सरन्यायाधीश’ म्हणून नियुक्ती होणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून हे प्रकरण हाताळणारे सरन्यायाधीश रमणा ही याचिका मार्गी लावतात, की उदय लळीत यांच्याकडे हे प्रकरण जाते, हे 22 ऑगस्टच्या सुनावणीत स्पष्ट झाले असते. मात्र, आता ही सुनावणी पुन्हा लांबणीवर गेल्याने सरन्यायाधीश लळीत यांच्यासमोर या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement