SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: मुंबईमध्ये पुन्हा हल्ला होणार? पाकिस्तानातून पोलिसांना धमकी..

मुंबई पोलीस ट्राफिक कंट्रोल रुमला व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज आला असल्याची बातमी पसरत आहे. या मेसेजमध्ये 26/11 सारखा भयानक हल्ला करणार असल्याची धमकी मेसेजमधून दिली आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशवादी हल्ल्याचे सावट पसरले आहे. संपूर्ण मुंबईत सध्या हाय अलर्ट जारी केला आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, त्या मेसेजमध्ये हा खुलासा करण्यात आला आहे की, मुंबईत हल्ला करण्यासाठी भारताच्या 6 जणांची मदत घेणार असल्याचंही म्हटलं आहे. ज्या नंबरवरून मेसेज करण्यात आले, तो नंबर पाकिस्तानातील असल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे ही धमकी देणारी व्यक्ती पाकिस्तानी आल्याचं दिसतंय. मेसेजमध्ये पुढे म्हटलंय की, “जर या नंबरचे लोकेशन ट्रेस केले तर तो भारताच्या बाहेर दाखवेल आणि बॉम्बस्फोट मुंबईत होईल”, असे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे.

Advertisement

राज्यासह देशात या बातमीने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान ही खरोखरच दहशतवादी संघटनेने दिलेली धमकी आहे की, इतर काही? सध्या पोलिसांनी या फोन कॉलचा तपास सुरू केला आहे. दरम्यान,राज्यभरात मोठ्या जल्लोष दहीहंडी साजरी झाली. यानंतर आता गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. धमकी देणाऱ्याने स्वतः अशी माहिती दिली असली तरी या मेसेजविषयी अजून पोलिसांचे स्पष्टीकरण आलेले नाहीय.

राज्य दहशतवाद विरोधी पथकासह (एटीएस) अन्य तपास यंत्रणांनाही याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, मुंबईतील महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अलिकडेच रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर 16 मीटर लांबीची एक संशयास्पद बोट सापडली होती. ज्यावर तीन एके-47 रायफल आणि 600 काडतुसे सापडली होती. त्यानंतर लगेच आलेल्या या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement