SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): कामाच्या स्वरुपात काहीसे बदल करायला हरकत नाही. नवीन ओळख बनवता येईल. गैरसमजुतीचे प्रसंग येऊ शकतात. मनातील इच्छा पूर्णत्वास येईल. सहकारी वर्गाचे सहाय्य मिळेल. सामुदायिक वादात लक्ष घालू नका. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आपल्या कामाबद्दल आज सर्वांसमोर स्पष्टता ठेवा.

वृषभ (Taurus): गुंतवणुक केलीय तर आज नफा होऊ शकतो. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. जिद्दीने कामे तडीस न्याल. कौटुंबिक वातावरण हलके फुलके ठेवाल. आज तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करू शकाल. धैर्याने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर शत्रूंना पराभूत कराल.

मिथुन (Gemini) : उत्तम मानवी मूल्ये जोपासा. मार्गदर्शन करण्याच्या सहज भावनेतून सर्वांना मदत करा. त्यातूनच तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आपोआप मधुर संबंध प्रस्थापित होतील. प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. प्रवासात काळजी घ्यावी. आध्यात्मात रूचि वाढेल. तुम्हाला आळस आणि आरामाचा त्याग करावा लागेल.

कर्क (Cancer) : लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. नवीन बौद्धिक आव्हान स्वीकाराल. सर्वांचे हित लक्षात घेऊन वागावे. जोडीदाराच्या कामगिरीचे कौतुक कराल. काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल.सिंह (Leo) : वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल. मन उल्हासित होईल. हौसेने काही गोष्टी पूर्ण कराल. बदलांना सकारात्मकतेने सामोरे जावे. नियम मोडून चालणार नाहीत. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. व्यावसायिकांसाठी निराशाजनक दिवस.

कन्या (Virgo) : बर्‍याच दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील. कामात काही अनपेक्षित बदल दिसून येतील. उत्तम कार्यशक्ती लाभेल. दर्जा जपण्या-साठी धडपड कराल. कुटुंबात वैचारिक देवाणघेवाण होईल. स्वत:च्या मतावर आग्रही राहाल. ईर्षेने परिस्थितीवर मात कराल. संघर्षमय स्थितीपासून लांब राहावे.

तुळ (Libra) : मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अतिखाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. आज तुम्हाला आपल्या भाऊ आणि बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. सहकार्‍यांचे लक्ष वेधून घ्याल. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. घरासाठी जागा बदलण्याचा विचार करा.

वृश्‍चिक (Scorpio) : काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल. नवीन नियम पाळताना कसरत करावी लागेल. सहकार्‍यांना मदतीचा हात पुढे कराल. मनाला प्रसन्नता वाटेल. दागिने ऑनलाईन खरेदीची संधी मिळू शकते.

Advertisementधनु (Sagittarius) : वैवाहिक जीवनात सुख मिळेल. मित्रांकडून आर्थिक लाभ होईल. आनंदाची बातमी मिळेल. नियोजनबद्ध कामे आखावीत. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. भागीदाराशी मतभेद होण्याची शक्यता. कुटुंबातील सदस्यांमधील अस्वस्थता तुमच्यासाठी चिंतेचा विषय असू शकते. वेळेचा योग्य उपयोग करून घ्याल.

मकर (Capricorn) : व्यक्तिमत्व विकासावर भर द्या. अंगीभूत कलागुणांचा विकास करता येईल. आज कामगिरी चांगली राहील. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. गोष्टींची आवश्यकता लक्षात घ्यावी. जिद्दीने कामे करण्यावर भर द्याल. जवळचा प्रवास चांगला होईल. तुमची स्वतःची नजर तुमच्या कर्तृत्वावर देखील असू शकते.

कुंभ (Aquarious) : सामाजिक कामात पुढाकार घ्याल. धार्मिक कार्यात वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुकूल बदल होऊ शकतात. जुन्या मित्रांच्या संपर्कात याल. मनावरील दडपण दूर होईल. कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात मित्रांचे सहकार्य मिळेल. विवाहितांना मुलांचे सुख मिळेल. तुमची प्रगती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल.

मीन (Pisces) : विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. एखाद्यावर जास्त विश्वास ठेवणे तणावपूर्ण असू शकते. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. व्यावसायिक चिंता दूर कराव्यात. प्रयत्नात कसूर करून चालणार नाही. तुमच्या कुटुंबातील वडील तुम्हाला सर्व उपक्रमांमध्ये आनंदाने मदत करतील. आजच्या दिवस मतभेदांपासून लांब रहा.

Advertisement