SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

यंदा 9 थरांचा विक्रम मोडणार? दहीहंडीवर लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव..

राज्यात यंदाचा दहीहंडी उत्सव खूप उत्साहात पार पडत आहे. कारण कोरोना महामारीच्या संसर्गामुळे तब्बल 2 वर्षांनंतर शिथिलता मिळाली आहे. दहीहंडीचा खेळात समावेश करून स्पर्धा भरविल्या जाणार, गोविंदांना 10 लाखांचे विमा संरक्षण, गोविंदांना शासकीय नोकरीत आरक्षण अशा मोठ्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक दहीहंडी मंडळांच्या आनंदात भर घातली.

राज्यातील विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवात (Dahihandi Utsav) लाखोंची बक्षीस ठेवण्यात आली असून कुठे कुठे तर मोठा जल्लोष होणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे. गोविंदा पथकांमध्ये राज्य शासनाच्या विविध घोषणांमुळे उत्साह वाढला असून दहीहंडीचा इथून मागे असणारा नऊ थरांचा विक्रम यंदा मोडण्याची तयारी पथकांनी केली आहे. त्यामुळे दहीहंडीची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई उपनगरीत आज चांगलीच धामधूम पाहायला मिळणार आहे. पोलिसांकडून सुरक्षेची काळजी घेण्यात येणार आहे.

Advertisement

राज्यभर दहीहंडी उत्सव यंदा साजरा होताना गोविंदा पथकांच्या 4 थरांपासून 9 थरापर्यंतचा थरथराट पाहायला मिळणारच आहे. पण काही ठिकाणी यंदा 10 थर लावण्याचा विक्रम होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी उंचच उंच फ्लेक्स आणि 10 थर लावणाऱ्यांस लाखो रुपयांचे बक्षीस काही मंडळाकडून देण्यात येणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून मुंबईतील ‘जय जवान’ गोविंदा पथक या भर पावसात सुद्धा दहीहंडीसाठी तगडी तयारी करत आहेत. याशिवाय मुंबई ठाण्यातील 200 पेक्षा अधिक गोविंदा पथक सराव करत आहेत. गोविंदा पथकाने यापूर्वी आतापर्यंत सर्वाधिक 9 थर लावण्याचा विश्वविक्रम केला आहे.

कुठे किती लाख रुपये बक्षीस…

Advertisement

1) ठाणे: संस्कृती युवा प्रतिष्ठान
▪️ आयोजक – आमदार प्रताप सरनाईक
▪️ बक्षीस – 10 थरांसाठी – 21 लाख
▪️ 9 थरांसाठी – 11 लाख
▪️ 8 थरांसाठी – 50 हजार

2) ठाणे: मनसे दहीहंडी उत्सव
▪️ आयोजक – मनसे नेते अविनाश जाधव
▪️ बक्षीस – 10 थरांसाठी – 21 लाख
▪️ 9 थरांसाठी – 11 लाख

Advertisement

3) ठाणे – भाजप पुरस्कृत स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव
▪️ आयोजक – शिवाजी पाटील
▪️ बक्षीस – 9 थरांसाठी – 11 लाख
▪️ 8 थरांसाठी – 25 हजार
▪️ 7 थरांसाठी- 10 हजार

4) ठाणे – शिवसेना टेंभी नाका मानाची हंडी
▪️ मार्गदर्शक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
▪️ बक्षीस- सर्वाधिक थर लावल्यास मुंबई ठाणे गोविंदा पथकाला प्रत्येकी दोन लाख 51 हजार रुपये
▪️ महिला गोविंदा पदकासाठी 1 लाख रुपयांचे बक्षीस
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement