SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आकर्षक बाईकचं स्वप्न होणार पूर्ण, अर्ध्याहून कमी किंमतीत येतेय ‘ही’ जबरदस्त बाईक..

भारतात सर्वसाधारणपणे सामान्य लोक आपल्या खिशाला परवडणाऱ्या बाईक्स (दुचाकी) खरेदी करत असतात. पेट्रोलच्या दरवाढीमुळे, आजकालच्या महागाईनेही हा विचार करावा लागतो की अधिक मायलेज देणाऱ्याच दुचाकी आपल्याला परवडतील. पण आपल्याकडे अनेक जण स्पोर्ट्स गाड्यांचे हौशी असतात.

स्पोर्ट्स बाईक सेगमेंट हा टू व्हीलर क्षेत्रातील एक महागडा आणि प्रीमियम सेगमेंट आहे ज्यात KTM, Bajaj, Yamaha, Honda, TVS, Hero या कंपन्यांच्या देखील बाईक्स आहेत. आज आम्ही स्पोर्ट्स बाईक्समध्ये सध्याच्या तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या KTM Duke 200 बद्दल सांगणार आहोत, कारण ही कमी मायलेज पण जबरदस्त परफॉर्मन्स देणारी बाईक तुम्हाला शोरूम मधून खरेदी केली तर 2 लाख रुपयांहून अधिक खर्च येईल, ती तुम्हाला कमी पैशांत सेकंड हँड खरेदी करता येणार आहे..

Advertisement

KTM Duke 200 वर असणाऱ्या खास ऑफर्सपैकी पहिली ऑफर DROOM वेबसाईटवर असून तिथे या बाईकचे 2015 चे मॉडेल पोस्ट केले आहे आणि इतर सर्व आवश्यक माहीती दिली आहे. येथे या बाईकची किंमत 50 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. येथून बाईक खरेदी केली की तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील मिळणार आहे.

बजेट कमी असेल तर दुसरी ऑफर OLX वेबसाईटवर आहे तू देखील नवीन बाईकपेक्षा तुम्हाला परवडणार आहे. तिथे KTM Duke 200 चे 2016 चे मॉडेल पोस्ट केले आहे. येथे या बाईकची किंमत 70 हजार रुपये ठेवली असून ही आकर्षक बाईक जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्हाला कोणतीही ऑफर किंवा फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

Advertisement

स्पोर्ट्स सेगमेंटमधील या जबरदस्त बाईकची तिसरी ऑफर BIKEDEKHO वेबसाईटवर दिली आहे. तिथे KTM Duke 200 चे 2014 चे मॉडेल विक्रीसाठी लीस्ट केले असल्याचं दिसतंय. या सेकंड हँड बाईकची या वेबसाईटवर किंमत 70 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या ठिकाणीदेखील तुम्हाला वन टाईम पेमेंट करून बाईक खरेदी करता येणार आहे , कारण ही बाईक खरेदी करण्यावर तुम्हाला कर्ज किंवा इतर कुठलीही ऑफर येथे मिळणार नाही.

(वेबसाईटवर ऑनलाईन खरेदी करताना आपल्या जबाबदारीवर खात्री करूनच खरेदी करावी. आम्ही वाचकांना केवळ माहीती पुरवत असतो.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement