SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चांदी 700 रुपयांनी स्वस्त, सोन्याच्या दरात ‘एवढ्या’ रुपयांची घसरण..

सध्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. काल देखील सोने-चांदी स्वस्त झाले होते आणि आजही दर घसरला आहे. यामुळे आज (दि. 19 ऑगस्ट) सोने चांदी जर तुम्हाला खरेदी करायचं असेल, तर ते आज तुम्हाला स्वस्त मिळणार आहे. आजच्या दराबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर आज सोने 100 रुपयांनी तर चांदी किलोमागे 700 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. म्हणून आज सोने चांदी खरेदी करण्याचा तुम्ही प्लॅन बनवू शकता.

भारतात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर आज सकाळीच 100 रुपयांनी स्वस्त होऊन 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आज राज्यात 47,800 रुपयांना मिळत आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दरही आज 100 रुपयांनी स्वस्त झाले असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 52, 150 रुपयांना मिळत आहे. तर आज 1 किलो चांदीचे दर तब्बल 700 रुपयांनी कमी झाले असून 56,000 रुपयांना मिळत आहे. हे दर (Gold-Silver Price) गुडरिटर्न्स वेबसाईटवरून घेण्यात आले आहेत.

Advertisement

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 48220 रुपये
▪️ मुंबई – 47,800 रुपये
▪️ दिल्ली – 47,950 रुपये
▪️ कोलकत्ता – 47,800 रुपये
▪️ बंगळुरू – 47,850 रुपये
▪️ हैदराबाद – 47,800 रुपये
▪️ पुणे – 47,830 रुपये
▪️ लखनऊ – 47,950 रुपये
▪️ नागपूर – 47,830 रुपये
▪️ नाशिक – 47,830 रुपये

Advertisement

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 52,600 रुपये
▪️ मुंबई – 52,150 रुपये
▪️ दिल्ली – 52,310 रुपये
▪️ कोलकत्ता – 52,150 रुपये
▪️ बंगळुरू – 52,200 रुपये
▪️ हैदराबाद – 52,150 रुपये
▪️ पुणे – 52,180 रुपये
▪️ लखनऊ – 52,310 रुपये
▪️ नागपूर – 52,180 रुपये
▪️ नाशिक – 52,180 रुपये

Advertisement

(देशात आज सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण झाली असून वरील दरांत आणि तुमच्या शहरांतील दरात किंचित फरक असू शकतो. स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधून तुम्ही आजच्या दरानुसार खरेदी करू शकता.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement