SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता ‘या’ व्यवहारांवर चार्जेस लागणार? रिझर्व्ह बँक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..

आगामी काळात UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करणे महागात पडू शकते. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी होणारा खर्च भरुन काढण्यासाठी रिझर्व्ह बँक या योजनेवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून यूपीआयच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते.

यूपीआय (UPI) आधारित पैसे हस्तांतरणाचा खर्च भरून काढण्यासाठी रिझर्व्ह बँक या योजनेचा विचार करत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने पेमेंट सिस्टीममधील चार्जेसवर चर्चा पेपर (Discussion Paper on Charges in Payment System) जारी केला आहे आणि शुल्काबाबत
लोकांकडून अभिप्राय मागवला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 17 ऑगस्ट रोजी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) आणि क्रेडिट कार्डबाबत हे अभिप्राय मागवले आहेत.

Advertisement

य चर्चापत्रामध्ये त्वरित पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस), नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) प्रणाली, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस-RTGS) प्रणाली आणि यूपीआय सारख्या पेमेंट सिस्टमशी संबंधित सर्व पद्धतींवरील शुल्कांचा समावेश आहे. यात डेबिट कार्ड (Debit Card), क्रेडिट कार्ड (Credit Card) आणि प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (पीपीआय) सारख्या विविध पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सचा देखील समावेश आहे.

UPI द्वारे रीअल टाईम पैसे ट्रान्फरची सुविधा ग्राहकांना मिळते. त्याच वेळी रिअल टाइम सेटलमेंट देखील सुनिश्चित करतं. UPI ही IMPS सारखी फंड ट्रान्सफर सिस्टम (Fund Transfer System) देखील आहे. UPI साठी IMPS सारख्या निधी हस्तांतरण व्यवहारांवर देखील शुल्क आकारले जावे. वेगवेगळ्या रकमेनुसार वेगवेगळे शुल्क ठरवता येऊ शकेल, असं रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, मोफत सेवा दिल्यास एवढ्या महागड्या पायाभूत सुविधांच्या तयारी आणि अंमलबजावणीचा मोठा खर्च कोण उचलणार, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे यूपीआय पेमेंटवर शुल्क आकारण्याचा विचार केला जात आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement