SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पिकांची नोंदणी झाली सोपी..शेतकऱ्यांना फक्त ‘हे’ करावे लागेल..!!

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची अचूक नोंद करता यावी, यासाठी राज्य सरकारने ई-पीक पाहणी मोबाईल अ‍ॅप सुरु केले होते.. मात्र, अनेक शेतकऱ्यांना त्याची फारशी माहिती नसल्याने अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात आल्यावर, यंदा या मोबाईल अ‍ॅपमध्ये काही बदल करण्यात आले आहेत..

पीक विमा योजना, नुकसान भरपाई पंचनामा, शासकीय मदत किंवा इतर शासकीय मदतीसाठी ई-पीक पाहणीची (E-Pik Pahani app) नोंद केलेली असणं महत्वाचं असतं.. शेतात जाऊन ई-पीक पाहणी करावी लागते.. गेल्या वर्षीच्या अ‍ॅपमध्ये सुधारणा करून आता ‘मोबाईल अ‍ॅप 2.0’ हे व्हर्जन खरिपातील पीक नोंदणीसाठी सज्ज झाले आहे.

Advertisement

गेल्या वर्षी सुरु केलेल्या ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये यंदा मोठे बदल केले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना हे अ‍ॅप वापरणं अधिक सोपे झाले आहे.. आता त्यात 48 तासांत दुरुस्तीची सोय करण्यात आली आहे. खरीपाची (2022-23) ई-पीक पाहणी प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना ‘गुगल प्ले स्टोअर’वरुन (Google play store) हे अ‍ॅप डाऊनलोड करुन त्याद्वारे पिकांची नोंद करता येणार आहे..

असे करा अ‍ॅप डाऊनलोड-

Advertisement

मोबाईलमधील ‘गुगल प्ले स्टोअर’वर जाऊन ‘ई-पीक पाहणी अ‍ॅप 2.0’ व्हर्जन डाऊनलोड करावे. तसेच खालील लिंकवर क्लिक करुनही अ‍ॅप डाऊनलोड करता येईल.

https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova&hl=en_IN&gl=US 

Advertisement

नवीन अ‍ॅपमध्ये काय..?

– आधीच्या ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये मुख्य पीक व दोन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा होती. मात्र, या सुधारित अ‍ॅपमध्ये एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिकांची नोंद करता येणार आहे. तसेच दुय्यम पिकांचा हंगाम, तारीख व क्षेत्राचीही नोंद करता येईल.

Advertisement

– नवीन अ‍ॅपवर ‘मदत’ हे बटन दिले असून, त्यावर क्लिक केल्यास प्रश्न-उत्तरे स्वरुपात माहिती मिळेल.. हे बटण सहज हाताळता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्नांचे निवारणही होणार आहे.

– सध्या अ‍ॅपद्वारे ई-पीक नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पिकाची नोंद केल्यापासून 48 तासांमध्ये एकदा त्यात दुरुस्ती करता येणार आहे. त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होईल.

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement