SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

19 ऑगस्ट 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ बांगड्यांच्या पेटीमधून पकडले 27.50 लाख रुपयांचे परकीय चलन, दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दोघांना अटक, तपास सुरू

✒️ दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता, स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम शासनातर्फे; खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Advertisement

✒️ रायगड येथे जी संशयित बोट सापडली त्याचा तपास आता एटीएस करणार, एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी घटनास्थळी दाखल होऊन बोटीची केली पाहणी

✒️ राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात 60 टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर, ग्रंथालयांबाबतचे कठोर निकष बदलण्यासाठी सूचना व शिफारसी मागविण्यात येणार

Advertisement

✒️ भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवनचा मोठा पराक्रम, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6500 धावा करणारा ठरला भारताचा 10वा फलंदाज

✒️ कर्नाटकातील शाळा-महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य: 3 शाळांमध्ये जन-गण-मन वाजवले जात नव्हते, तक्रार आल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी दिले आदेश

Advertisement

✒️ राज्य सरकारी महावितरण कंपनीच्या वीज खरेदी खर्चात 13 टक्के वाढ; वाढीव खर्चाचा बोजा ग्राहकांवरच पडण्याची शक्यता

✒️ मुंबईतील बेस्ट च्या दुमजली (डबलडेकर) इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण, मुंबईला प्रदूषण मुक्त करण्यासाठी बेस्टच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविणार

Advertisement

✒️ जळगावात सिंगापूर विद्यापीठात नोकरीची फूस लावून प्राध्यापकाला लुटले; 10 लाख 87 हजार 488 रुपयांना फसवल्याचा प्रकार उघडकीस

✒️ युट्युबवर अनेक रेसिपी शिकविणारी मधुरा बाचल आता टीव्हीवर दिसणार, स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या टीव्ही मालिकेत दिसणार
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement