SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. सतत खटपट करत राहाल. जवळच्या व्यक्तींच्या सहवासाची ओढ वाढेल. सर्वांशी जुळवून घ्यावे लागेल. आवडत्या गोष्टीत रमून जाल. चांगली बातमी कानावर येईल. नोकरीच्या ठिकाणी नवीन कामे मिळेल. मन प्रसन्न राहील. आजचा दिवस ठीक जाईल. कामाच्या ठिकाणी ओळखीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्याल. मन:शांति जपावी लागेल.

वृषभ (Taurus): फार चिडचिड करू नका. काही गोष्टी शांततेच्या मार्गाने सोडवाव्यात. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. शांत व संयमी विचार करावा. चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. उत्साहात किंवा आनंदाच्या क्षणात सामील होण्याची संधी मिळेल. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका.

Advertisement

मिथुन (Gemini) : सामाजिक दर्जा सुधारता येईल. तुमचे अस्तित्व इतरांना दाखवून द्याल. अधिकार वाढीसाठी प्रयत्न कराल. महत्त्वाची सरकारी कामे पुढे सरकतील. गोड बोलून कामे साध्य करता येतील. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांची मदत मिळेल. उत्पन्न स्थिर राहील. जोडीदाराकडून प्रेम मिळेल. सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल.

कर्क (Cancer) : बौद्धिक दिमाख दाखवाल. उपासनेत प्रगती करता येईल. स्पर्धेत भाग घ्याल. एककल्ली विचार करू नका. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. नोकरीच्या ठिकाणी अधिकार वाढतील. दिवसभर कुठलीतरी चिंता जाणवले. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरू शकेल.

Advertisement

सिंह (Leo) : कामाच्या स्वरुपात काहीसे बदल करायला हरकत नाही. नवीन ओळख बनवता येईल. गैरसमजुतीचे प्रसंग येऊ शकतात. प्रवासात काळजी घ्यावी. सामुदायिक वादात लक्ष घालू नका. जुने मित्र भेटतील. आर्थिक प्रगतीसाठी संधी मिळतील. वाहन चालवताना काळजी घ्या. आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल.

कन्या (Virgo) : चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. जुन्या मित्रांच्या संपर्कात याल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. उत्पन्न वाढेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास सफल होईल. जोडीदाराचे प्रेम मिळेल. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. जिभेवर ताबा ठेवा.

Advertisement

तुळ (Libra) : कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक गोष्टीत कौटुंबिक सहकार्य घ्यावे. मनातील इच्छेला मुरड घालून पहावी. अधिकारांचा योग्य ठिकाणी वापर करावा. कामाचा उरक वाढवावा लागेल. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात विचार करून गुंतवणूक करा तरच लाभ मिळेल. उत्पन्न स्थिर राहील. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस.

वृश्‍चिक (Scorpio) : उपासनेत अधिक वेळ घालवावा. गैरसमजातून होणारी कटुता टाळा. आपले मत इतरांवर लादू नका. नियमित व्यायामावर भर द्यावा. शांत विचार करण्याची गरज भासेल. व्यवहार करताना घाई करू नका. उत्पन्न वाढेल. अविवाहित तरुण तरुणींसाठी योग्य जोडीदार मिळेल. व्यक्तिमत्व विकासावर भर द्या. अंगीभूत कलागुणांचा विकास करता येईल.

Advertisement

धनु (Sagittarius) : जोडीदाराशी बोलताना मतभिन्नता वाढू शकते. त्याच्या मानी स्वभावाचा अचंबा वाटेल. नवीन लोक संपर्कात येतील. व्यवहारी दृष्टीकोन ठेवून वागावे लागेल. घरगुती कामात गुंतून पडाल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. धोका पत्करू नका. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ जाईल. जोडीदाराची काळजी घ्या. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा. आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती आहे.

मकर (Capricorn) : काही कामे उगाचच वेळ घेतील. क्षुल्लक अपयशाने खचून जाऊ नका. योग्य संधीची वाट पहावी लागेल. काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. आत्मचिंतन करावे लागेल. विनाकारण खर्च होईल. अपेक्षा पूर्ण न झाल्याने चीडचीड होईल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धन आणि प्रतिष्ठेची हानी असे कृत्य करू नका.

Advertisement

कुंभ (Aquarious) : कामात काही अनपेक्षित बदल दिसून येतील. उत्तम कार्यशक्ती लाभेल. दर्जा जपण्यासाठी धडपड कराल. ईर्षेने परिस्थितीवर मात कराल. संघर्षमय स्थितीपासून लांब राहावे. रोजगारासाठी केलेले प्रयत्न सफल होतील. मोठी अडचण दूर होईल. वादविवादात पडू नका. घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. आपल्या वागणुकीने आदर्श निर्माण कराल.

मीन (Pisces) : मान टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहाल. राजकारणी धोरण आजमावून पहाल. आत्मबळाने वाटचाल करावी. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. कोर्ट कचेरीचे काम मार्गी लागेल. रागावर ताबा ठेवा. ताणतणाव, दडपणाच्या मनःस्थितीवर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तसेच तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील.

Advertisement