SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘मारुती अल्टो’ नव्या रुपात लाॅंच, ग्राहकांना मिळणार अत्याधुनिक फीचर्स..

कार खरेदी करण्याचा विचार असेल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.. भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी ‘मारुती सुझुकी’ने आपली सर्वाधिक लोकप्रिय ‘अल्टो’ कार नव्या अवतारात गुरुवारी (ता. 18) लाॅंच केली.. ‘मारुती अल्टो के-10’ असं या नव्या माॅडेलचं नाव आहे..

गेल्या काही दिवसांपासून ‘मारुती सुझुकी’च्या अल्टो के -10 या कारची (Maruti Alto K-10) ग्राहकांना प्रतीक्षा लागली होती. अखेर गुरुवारी या कारचे लाॅंचिंग झालं. ‘मारुती’ कंपनीने आपल्या ‘हर्टटेक्ट’ (Heartect) प्लॅटफॉर्मवर ही कार तयार केलीय. जुन्या मॉडेलच्या तुलनेत या कारमध्ये अनेक नवे फीचर्स देण्यात आले आहेत.

Advertisement

भारतात ‘अल्टो’ला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळालय. सर्वाधिक विक्री होणाऱ्या ‘अल्टो’ कारचे नवीन व्हर्जनही दिसायला खूप स्पोर्टी नि आकर्षक असल्याने ग्राहकांच्या पसंतीस पडेल, असे दावा कंपनीकडून करण्यात आला आहे..

‘अल्टो के -10’ची वैशिष्ट्ये

Advertisement
 • नवीन कारमध्ये ऑटो गियर शिफ्ट, स्मार्ट प्ले स्टुडिओ, 4 स्पीकर्स, डिजिटल स्पीडो मीटर, की-लेस एन्ट्री, 1.0 लिटर इंजिन, आदी अत्याधुनिक फीचर्स दिलेले आहेत.
 • शिवाय गियर शिफ्टिंगसह 15 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
 • कारमध्ये बॅक कॅमेरा व दोन एअरबॅग्ज असतील.
 • ऑल पॉवर विंडो, Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM, मॅन्युअल एअर कंडिशनिंग, 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ऑल ब्लॅक इंटीरियर आदी फीचर्स मिळणार आहेत.
 • ही कार 24.9 किमी मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केलाय..

इंजिन – या कारमध्ये 1.0L K10C ड्युअल जेट पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 67 hp ची पॉवर आणि 3,500 rpm वर 89 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच, यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन व 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहेत.

मॉडेलनिहाय किंमत

Advertisement
 • STD- 3.99 लाख रुपये
 • LXI- 4.82 लाख रुपये
 • VXI- 4.99 लाख रुपये
 • VXI+ – 5.33 लाख रुपये

मॅन्युअल ट्रांसमिशन

 • VXI- 5.49 लाख रुपये
 • VXI+ – 5.83 लाख रुपये

11 हजारांत बुकिंग

Advertisement

ग्राहकांना फक्त 11,000 रुपयांची टोकन रक्कम भरून नवीन अल्टो के-10 (Alto K10) ही कार ऑनलाइन किंवा डीलरकडे बूक करता येणार आहे. गेल्या 22 वर्षांपासून दर तासाला कंपनीने 100 ‘अल्टो’ कारची विक्री केलीय.. त्यामुळे देशातील ऑटोमोबाईल क्षेत्र बदलल्याचा दावा ‘मारुती’ कंपनीने केला आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement