SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांसाठी फायद्याची बातमी, दुधाच्या दरात ‘एवढ्या’ रुपयांची झाली वाढ..

सध्या देशासह महाराष्ट्रातील नागरिक महागाईने त्रस्त झाले असताना सामन्यांना आता आणखी एक फटका बसणार आहे. कारण आता राज्यभरात दूधाच्या दरामध्येही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 जुलै रोजी गोकुळने दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ केल्यानंतर अमूल, मदर, चितळे, महानंद सारख्या मोठ्या ब्रॅण्डने गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात वाढ केली आहे.

काल (ता. 17 ऑगस्ट) झालेल्या झूम मिटिंगमध्ये हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. राज्यभरातील दूध व्यावसायिकांच्या संघटनेने गायी व म्हशीच्या दुधाच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (ता. 19 ऑगस्ट) शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. म्हैस आणि गाईच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटरला सरसकट दोन रुपये वाढ करण्यात येत आहे.

Advertisement

दरम्यान राज्यात अतिवृष्टी असो की दुष्काळ जास्तीत जास्त नुकसान सोसणाऱ्या शेतकरी वर्गाला या निर्णयाचा अधिक फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना 3.5, 8.5 या फॅटसाठी एक लिटरसाठी 37 रुपये मिळू शकतात, असा अंदाज आहे. मागील काही महिन्यांपासून (Milk producer) दूध उत्पादकांना चांगले दिवस येत आहेत. कारण तीन महिन्यांपूर्वीदेखील (Milk Rate Hike) दुधाच्या दरात वाढ झाली होती.

राज्य दूध उत्पादक व प्रक्रियाकारक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, ”महाराष्ट्रातील सर्व प्रमुख दूध व्यावसायिकांची बुधवारी (ता.17 ऑगस्ट) संध्याकाळी झूम मिटिंग घेण्यात आली. यात डिझेल, पॅकिंग मटेरियल आणि वीजदरात झालेली वाढ लक्षात घेता दूध विक्री दरात 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातील विविध ब्रँडचे दर वेगवेगळे आहेत. या निर्णयामुळे त्यांच्या आताच्या दरामध्ये दोन रुपयांनी वाढ झाली आहे”, असं ते म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement