SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

18 ऑगस्ट 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील मशिदीत झालेल्या स्फोटात 21 जण ठार तर 60 जखमी; सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

✒️ इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीकडून सौरऊर्जेवर चालणार्‍या ‘सूर्य नूतन’ या स्टोव्हची निर्मिती; केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, हरदीपसिंग पुरी यांनी केले लोकार्पण

Advertisement

✒️ राज्य नाट्य स्पर्धा 15 नोव्हेंबरपासून सुरु होणार, नाट्य संस्थांकडून 15 सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका मागविण्यात येणार असल्याची माहिती

✒️ भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती; गडचिरोली जिल्ह्यातील 18, भंडारा जिल्ह्यातील 78 रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद

Advertisement

✒️ विनोदी अभिनेता व कॉमेडियन राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर; प्रकृतीत सुधारणा, पूर्ण शुद्धीवर येण्यासाठी अजून एक आठवडा लागणार

✒️ भाजप संसदीय बोर्ड आणि निवडणूक समितीची घोषणा, देवेंद्र फडणवीस सदस्य; नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान समितीबाहेर

Advertisement

✒️ पश्चिम बंगालमध्ये मायापूर येथील इस्कॉनच्या मुख्यालयात 1 हजार कोटींत तयार होतेय जगातील सर्वात मोठे मंदिर, 2009 पासून मंदिराचे काम सुरू, भगवान कृष्ण विराजमान होणार

✒️ विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी सरकारने 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक मदत

Advertisement

✒️ इंधन दरवाढीतून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा, सीएनजीमध्ये 6 रुपये प्रतिकिलो आणि पीएनजीच्या दरात प्रतियुनिट 4 रुपयांची कपात

✒️ शिंदे सरकार स्थापन होताना संविधानाच्या 10 व्या परिशिष्टाचं उल्लंघन केल्याचा दावा, या सरकारविरोधातील हस्तक्षेप याचिकेवर 22 ऑगस्टला सुनावणी होणार
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement