SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): जुन्या विचारात अडकून राहू नका. वडीलांची नाराजी दूर करावी लागेल. आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा लागेल. न्यायी वृत्तीने वागाल. कर्मठ विचार दर्शवू नका. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाही. प्रयत्नांसाठी नियोजन आणि सातत्य महत्त्वाचे. अनुभवींचा सल्ला घेऊन नियोजन करणे हिताचे.

वृषभ (Taurus): खोलवर विचार करावा लागू शकतो. काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल. भावंडांची समजूत काढावी लागेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. स्वकर्तुत्वावर अधिक भर द्याल. अतिरेक घातक असतो हे लक्षात ठेवा. आत्मविश्वास हवा पण अतिआत्मविश्वास नको. विचारपूर्वक वागणे हिताचे.

मिथुन (Gemini) : व्यवहारी दृष्टीकोन ठेवून वागाल. राजकारणी विचार मांडाल. नसते डावपेच खेळायला जाऊ नका. चिकाटीने कामे कराल. चटकन निराश होणे टाळावे. आनंदात दिवस जाईल. मनाजोगत्या घटना घडतील. प्रगतीचा योग आहे. वास्तवाचे भान राखणे आणि व्यवहारज्ञानाने वागणे हिताचे.

कर्क (Cancer) : गृहसौख्याला प्राधान्य द्यावे. मनात उगाचच चिंता निर्माण होतील. काही गोष्टी तडजोडीने स्वीकाराव्या लागतील. व्यावसायिक गुंतवणूक करावी लागेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. थांबणे आणि विसंबून राहणे टाळा. आत्मनिर्भर व्हा. प्रगतीचा योग आहे. वास्तवाचे भान राखणे हिताचे.

Advertisementसिंह (Leo) : थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. मेहनतीला मागे हटू नका. तुमचे ज्ञान उपयोगी पडेल. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नका. डोकं शांत ठेवा आणि विचारपूर्वक कृती करा. प्रसंगाला धीराने सामोरे जा. भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि व्यावहारिक राहणे हिताचे.

कन्या (Virgo) : कामात एकसूत्रता ठेवावी. घरात काही बदल करून पहावेत. सामाजिक वजन वाढेल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. अधिक चिकाटीने कामे करावीत. तुमचा सल्ला इतरांसाठी फायद्याचा ठरेल. व्यवहारज्ञानाचा उपयोग होईल. तब्येत जपा. घरच्यांना वेळ द्याल.

तुळ (Libra) : मनातील निराशा झटकून टाकावी. उगाचच दडपण घेऊन राहू नका. नवीन गोष्टी समजून घ्याव्यात. आपली वैचारिकता बदलून पहावी. जोडीदारापाशी मन मोकळे करून पहावे. आत्मनिर्भर व्हा. निर्णय विचारपूर्वक आणि स्वतःच्या हिंमतीने घेऊन मग ते अंमलात आणा. अनुभवींचा सल्ला घेणे हिताचे.

वृश्‍चिक (Scorpio) : सहकारी लोकांची चांगली साथ मिळेल. कामात समाधानी असाल. नातेवाईक दुरावू शकतात. कामानिमित्त प्रवास घडेल. अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. खरेदीचा योग आहे. खर्च वाढेल. गरज ओळखून निर्णय घेणे हिताचे. दिवस मजेत जाईल.

Advertisement


धनु (Sagittarius) : चिकाटीने कामे करून दाखवाल. विचार करण्यात अधिक वेळ घालवाल. मोजक्याच शब्दांचा वापर करावा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल. धार्मिक कामात मदत करावी. चांगला मित्र जोडणे हिताचे. प्रसंगी तज्ज्ञांचा सल्ला घेणे लाभाचे. योग्य अयोग्य समजून घेऊन मग निर्णय घेणे हिताचे.

मकर (Capricorn) : आधुनिक गोष्टी जाणून घ्याव्यात. हट्टीपणे विचार कराल. स्वत:च्या इच्छेपुढे इतर गोष्टी दुय्यम वाटतील. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात. विशेष प्रयत्न करणे लाभाचे. दिवस प्रगतीचा. उत्साह वाढेल. आत्मविश्वास वाढेल.

कुंभ (Aquarious) : काही कामे रेंगाळून पडू शकतात. चिकाटी सोडून चालणार नाही. मनातील नकारात्मक विचार दूर सारावेत. अनावश्यक खर्च टाळावा. मागचा-पुढचा नीट विचार करावा. चिंतामुक्त व्हाल. दिवस मजेत जाईल. स्वतःच्या मर्जीचे मालक असाल. स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी वेळ काढाल.

मीन (Pisces) : पारंपरिक कामात यश येईल. वडिलोपार्जित कामे धनदायक ठरतील. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत. मोहात अडकू नका. स्पष्ट विचार नोंदवा. प्रतिष्ठा वाढेल. इतरांवर प्रभाव टाकाल. निर्णय घेऊन कामं वेगाने पूर्ण कराल. प्रगती होईल.

Advertisement