SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शिंदे गटातील 8 मंत्र्यांना आणखी खाती? वाचा मोठी राजकीय घडामोड..

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्याच्या महिन्याभरापेक्षा जास्त कालावधीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ असे एकूण 18 मंत्र्यांना खातेवाटप करून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. पण आता मोठी बातमी समोर आली आहे.

आता पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. राज्याच्या राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत असताना आता नव्या सरकारमध्ये विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी शिंदे गटामधील 8 मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे त्यांची आणखी जबाबदारी वाढली आहे.

Advertisement

राज्यात या 18 मंत्र्यांना खातेवाटप झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे राखून ठेवण्यात आलेली उर्वरित खाती पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच शिंदे गटातील 8 मंत्र्यांकडे देण्यात आली आहे.

कोणत्या मंत्र्याकडे कोणते अतिरिक्त खाते?

Advertisement

▪️ उदय सामंत – माहिती आणि तंत्रज्ञान

▪️ शंभूराज देसाई – परिवहन

Advertisement

▪️ दादा भूसे – पणन

▪️ संजय राठोड – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

Advertisement

▪️ तानाजी सावंत – मृद व जलसंधारण

▪️ अब्दुल सत्तार – आपत्ती व्यवस्थापन

Advertisement

▪️ दीपक केसरकर – पर्यावरण व वातावरणीय बदल

▪️ संदीपान भुमरे – अल्पसंख्याक व औकाफ
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement