SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नेत्यांनंतर बाॅलीवूडही ‘ईडी’च्या फेऱ्यात, ‘या’ दिग्गज अभिनेत्रीविरुद्ध आरोपपत्र

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय नेते ‘ईडी’च्या रडारवर आले आहेत. त्यावरुन मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोपही होत असतात.. मात्र, राजकीय नेत्यानंतर आता ‘ईडी’ची वक्रदृष्टी बाॅलिवूडवर पडली आहे.. बाॅलिवूडमधील एका दिग्गज अभिनेत्रीविरोधात ‘मनी लाॅन्ड्रिंग’प्रकरणी ‘ईडी’ने मोठी कारवाई केली आहे..

जॅकलिन फर्नाडिस, असं या अभिनेत्रीचं नाव आहे.. काही दिवसांपूर्वीच सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत जॅकलिनचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचं समोर आलं. तसंच, त्याने आपल्या ‘बिग बजेट’ सिनेमात जॅकलिनला मुख्य भूमिका देण्याचंही आश्वासन दिलं होतं..

Advertisement

आपण आरोपी नसून साक्षीदार..

नुकतेच 200  कोटींच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ‘ईडी’ने (अंमबजावणी संचनालय) या सुकेश विरोधात आरोपपत्र दाखल केलंय.. त्यात जॅकलिनलाही आरोपी करण्यात आलं आहे.. त्यासाठी ‘ईडी’ने ‘सप्लीमेंट्री चार्जशीट’ दाखल केलंय. ‘ईडी’ने बऱ्याचदा तिला चौकशीसाठीही बोलावलं, परंतु या प्रकरणात आपण आरोपी नसून साक्षीदार असल्याचं जॅकलिनचं म्हणणं आहे..

Advertisement

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात ‘ईडी’ने (enforcement directorate) जॅकलिनलाही आरोपी केलं असलं, तरी कोर्टानं अद्याप ‘ईडी’च्या आरोपपत्राची दखल घेतलेली नाहीय. त्यामुळे जॅकलिनला सध्या तरी अटक करता येत नाही, परंतु तिला देशाबाहेर जाता येणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे..

गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत आहे. त्यात जॅकलिनवर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. अनेक वेळा तिची ‘ईडी’कडून चौकशीही झाली आहे.. या प्रकरणात जॅकलिन व सुकेशमध्ये संबंध असल्याचं आढळलं होतं. सुकेश चंद्रशेखर हा तुरुंगात असतानाही जॅकलिन त्याच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement