SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

उद्धव ठाकरे गटाला दणका, सुप्रिम कोर्टाने ‘ही’ याचिका फेटाळली..!!

राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा सध्या सुप्रिम कोर्टात प्रलंबित आहे.. शिवसेनेतील बंडखोर 16 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसह 5 याचिका सुप्रिम कोर्टात प्रलंबित आहेत. दुसरीकडे या खटल्यावर सतत ‘तारीख पे तारीख’ सुरु आहे. त्यामुळे ठाकरे गट अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे…

सुप्रिम कोर्टात आधी 8 ऑगस्टला होणारी सुनावणी 12 ऑगस्टवर गेली.. त्यानंतर पुन्हा ही सुनावणी 22 ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली.. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षावर दावा सांगितला आहे. ठाकरे व शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे तसे पुरावेही सादर केले आहेत.

Advertisement

ठाकरे गटाची याचिका फेटाळली

शिवसेना पक्ष व पक्षचिन्हावर कुणाचा हक्क असेल, याचा निर्णय येत्या 19 ऑगस्ट रोजी केंद्रीय निवडणूक आयोग घेणार असल्याचे समजते.. ही बाब लक्षात आल्यावर ठाकरे गटाने सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे.

Advertisement

शिंदे गटाविरोधात दाखल याचिकांवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तशी याचिका ठाकरे गटातर्फे सुप्रीम कोर्टात ‘मेन्शन’ करण्यात आली. शिवसेनेच्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी या याचिकेत केली होती..

दरम्यान, ठाकरे गटाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रिम कोर्टाने नकार दिला आहे.. ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली आहे. हा खटला घटनापीठासमोर चालवायचा की नाही, यासंदर्भातीलच निकाल होणे बाकी आहे. तसेच याबाबत निकाल आम्हाला देणे आवश्यक असल्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी सांगितले..

Advertisement

याचिका फेटाळल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाआधीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ‘शिवसेना कोणाची’ याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे शिवसेना पक्ष हातातून निसटतो की काय, अशी भीती ठाकरे गटाला वाटत आहे..

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement