SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकऱ्यांचा महापूर..!! पोस्टात तब्बल 1 लाख पदांसाठी मेगाभरती..

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. भारतीय टपाल विभागात तब्बल एक लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत. देशातील पोस्ट विभागातील 23 मंडळांमधील रिक्त पदे भरण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.. पोस्ट विभागातील या भरतीबाबतची (India post recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

भारतीय टपाल खात्यात होणाऱ्या या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या…

Advertisement

देशात पदनिहाय जागा

पद एकूण जागा 
पोस्टमन 59,099 जागा
मेल गार्ड 1445 जागा
मल्टी-टास्किंग पोस्ट 37,539 जागा

 

Advertisement

पोस्ट विभागातील वरील पदांसह ‘स्टेनोग्राफर’ची पदेही मंडळनिहाय मंजूर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही या सर्व पदांसाठी जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले..

महाराष्ट्रात पदनिहाय जागा

Advertisement
पद एकूण जागा 
पोस्टमन  9884 जागा
मेल गार्ड   147 जागा
मल्टी-टास्किंग पोस्ट  5478  जागा

 

शैक्षणिक पात्रता

Advertisement
  • वरील पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असावेत. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक. काही जागांसाठी उमेदवार इंटर किंवा 12 वी पास असावा.
  • मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असावा.
  • संबंधित पदाचा किमान अनुभव असावा.
  • पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक.

वयोमर्यादा – किमान 18, कमाल 32 वर्षे.

असा करा अर्ज

Advertisement
  • सर्वप्रथम इंडिया पोस्टाच्या indiapost.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • मुख्यपृष्ठावरील भरती लिंकवर क्लिक करा
  • अर्ज करण्यापूर्वी पोस्ट निवडा, त्याचे पात्रता निकष तपासा
  • स्वतःची नोंदणी करा, फॉर्म भरा, फी भरा व अर्ज सबमिट करा
  • पुढील कामासाठी पोचपावती फॉर्म डाउनलोड करा, सेव्ह करा व प्रिंट आउट घ्या.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement