SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बिग बॉस मराठी’ ठरतंय हिट, महेश मांजरेकर घेताय तब्बल ‘एवढं’ मानधन..?

मराठी इंडस्ट्रीत आपला दरारा कायम ठेवलेले अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर त्यांचा 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक म्हणून महेश यांनी आपली ओळख बनवली आहे. वास्तव सिनेमातून सुरु झालेला अभिनेते महेश मांजरेकर यांचा प्रवास आजही अखंड चालू आहे.

वास्तव, अस्तित्व, विरूद्ध अशा एकाहून एक बेस्ट सिनेमांचं दिग्दर्शन करणारे मांजरेकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीलाच नव्हे हिंदी चित्रपटसृष्टीलाही भरभरून प्रेम दिलंय. नटसम्राट, काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दे धक्का अशा सुपरहिट सिनेमांसाठी त्यांना ओळखलं जातं. टेलिव्हिजनवर तर ‘बिग बॉस’ (Big Boss) अशी त्यांची ओळख आहे. चला तर मग जाणून घेऊ की, ‘बिग बॉस मराठी’चा येणाऱ्या चौथ्या सीझनसाठी त्यांनी किती मानधन घेतलं ते..

Advertisement

सध्या अधिकृत माहीती नसली तरी मांजरेकर बिग बॉसच्या एका आठवड्याला तब्बल 25 लाख रुपये एवढी भलीमोठी रक्कम आकारतात, असं समजतंय. म्हणजेच पूर्ण विचार करता असं दिसतं की त्यांचं या शोचं एकूण मानधन हे कित्येक कोटींच्या घरात असेल. आता हे आकडे पूर्वीच्या सीझनचे असले तरी यामध्ये यंदाच्या सिझनला नक्कीच वाढ झाली असणार आहे. म्हणजे यामधून तुम्ही एकंदरीत आकड्यांचा अंदाज लावू शकता.

एवढंच नव्हे तर बिग बॉस मराठीसारखा बहुचर्चित कार्यक्रम सोडला तर या कलाकाराने दिग्दर्शक म्हणून देशभर नव्हे तर जगभरात नाव कमावलं आहे. सलमान खानच्या अनेक हिट सिनेमांमध्ये महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिसले. अफाट लोकप्रियता मिळाल्याने महेश यांचं नेट वर्थ हे चाळीस कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचं सांगितलं जातं. महेश मांजरेकर प्रत्येक सिनेमासाठी 30-50 लाख रुपये आकारतात अशीही माहीती आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement