SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ज्येष्ठांच्या एसटी प्रवासाबाबत मोठी घोषणा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 महत्वपूर्ण निर्णय..

राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (ता. 17) सुरुवात होत आहे.. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (ता. 16) शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक झाली.. त्यात शिंदे सरकारने राज्यातील जनतेसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

शिंदे सरकारचे निर्णय..

Advertisement

ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली.. भारतीय स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.. ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डद्वारे सवलतीच्या दरात एसटी प्रवास करता येत होता. मात्र, आता वयाची पंच्च्याहत्तरी पूर्ण केलेल्या नागरिकांना एसटीने मोफत प्रवास करता येणार आहे..

Advertisement

गोविंदांना विमा कवच

दहीहंडीचा सण येत्या शुक्रवारी (ता. 19) राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.. या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांच्या मागणीवरुन शिंदे सरकारने गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखांचे विमा कवच दिले आहे.. गोविंदांना देण्यात आलेल्या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

Advertisement

वैद्यकीय शिक्षण विभागाबाबत…

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलच्या माध्यमातून  करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा झाली.. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी हे निर्देश दिले.

Advertisement

तसेच, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’  सुरू करण्यात येणार आहे. लतादीदींच्या जयंती दिनी म्हणजे, 28 सप्टेंबर रोजी हे संगीत महाविद्यालय सुरू केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली..

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती व ओल्या दुष्काळाग्रस्तांना केलेली अल्प मदत, यामुळे विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, आघाडी सरकारपेक्षा वेगानं निर्णय घेत असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय…

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement