SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : जम्मू-काश्मीरमध्ये 39 जवानांसह बस नदीत कोसळली, अशी घडली घटना..!!

जम्मू-काश्मीरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.. काश्मीरच्या पहलगाम येथील चंदनवाडी परिसरात जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली.. पहलगामच्या बेताब खोऱ्यात हा भीषण अपघात झाला.. या बसमध्ये 39 जवान होते. त्यापैकी या दुर्घटनेत 6 जवान शहीद झाले असून, मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे..

काश्मीरमधील पहलगामच्या फ्रिस्लान जवळील घाटातून ही बस जात होती. या बसमध्ये ‘आयटीबीपी’चे 37 जवान, तसेच जम्म-काश्मीरमधील दोन पोलिस प्रवास करीत होते.. चंदनवाडी परिसरात ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस रस्त्याकडेच्या नदीत 200 फूट खोल दरीत कोसळली.

Advertisement

6 जवान शहिद

या अपघातात बसचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला.. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जवानांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती ‘आयटीबीपी'(ITBP) कडून देण्यात आली.. मात्र, या अपघातात अनेक जवान गंभीर जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमी जवानांना उपचारासाठी श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात हलवण्याचे काम सुरु होते.. घटनास्थळी युद्ध पातळीवर मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले होते..

Advertisement

अमरनाथ गुफेकडून म्हणजेच चंदनवाडीहून पहलगामकडे जात असताना, हा भीषण अपघात झाला. अमरनाथ यात्रा परिसरात या जवानांना तैनात करण्यात आले होते. अचानक बसचे ब्रेक फेल झाल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात येते.. या प्रकरणाबाबत घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement