SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर..! स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या ‘या’ योजनेतून होणार जबरदस्त कमाई..

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांत सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे.. ग्राहकांना स्वस्तात सोने खरेदी करता यावे, यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये एक योजना सुरु केली होती. ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ योजना असं त्याचं नाव..!! ‘आरबीआय’मार्फत केंद्र सरकार दरवर्षी ही योजना राबवत असते..

केंद्र सरकार ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ योजनेत गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोनं देत नाही, तर डिजीटल रुपात ‘गोल्ड बॉण्ड्स’ विकत असते. त्याद्वारे सोन्यात पैसे गुंतवता येतात. प्रत्यक्ष सोन्यापेक्षा कमी किंमतीत हे ‘गोल्ड बाॅंड्स’ घेता येतात.. त्यातून चांगला परतावा मिळतो.. शिवाय, सरकारी योजना असल्याने नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता नसते..

Advertisement

दुसऱ्या सीरिजच्या तारखा जाहीर

सोन्यातील गुंतवणूक वाढावी, त्यात पारदर्शकता यावी, यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ (Sovereign Gold Bond) योजनेची सीरिज जारी करीत असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे (RBI) यंदाची या योजनेची पहिली सीरिज 20 ते 24 जून दरम्यान झाली होती. त्यानंतर आता ‘आरबीआय’ने योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

Advertisement

‘आरबीआय’च्या माहितीनुसार, या वर्षातली या योजनेची दुसरी मालिका 22 ऑगस्टपासून सुरु होणार असून, ती 26 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.. मात्र, या योजनेतील ‘गोल्ड बाॅंड’च्या किंमती अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. लवकरच या किंमती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे..

अशी करा गुंतवणूक…!!

Advertisement

‘सॉव्हरेन गोल्ड बाँड’ योजनेत प्रत्येक व्यक्तीला एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो, तर कमीत कमी 1 ग्रॅम ‘गोल्ड बॉण्ड’ खरेदी करता येतात. तसेच, ट्रस्ट किंवा तत्सम संस्थांना सूट देण्यात आली असून, त्यांना 20 किलोपर्यंत ‘गोल्ड बॉण्ड’ खरेदी करता येतात. निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे, धर्मादाय संस्थांना हे खरेदी करता येतात.

‘गोल्ड बॉण्ड्स’साठी अर्ज करणार्‍या, तसेच ऑनलाईन पेमेंट करणार्‍यांना प्रति ग्रॅममागे 50 रुपये सूट दिली जाते.. गुंतवणूकदारांना निश्चित किंमतीवर सहामाही आधारावर वार्षिक 2.5 टक्के व्याज दिले जाते. परताव्याबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या वर्षात ‘गोल्ड बाॅंड’मधून गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा मिळालाय आहे..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement