SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

देशात एकच खळबळ, मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी..?

देशभरात गाजलेल्या अँटिलिया प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा अंबानी कुटुंबाला धमक्या आल्या आहेत. जगात प्रसिद्ध असणारे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, अशी बातमी पसरली आहे. यामुळे राज्यासह देशात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस चौकशी होणार असल्याची माहीती आहे.

जगभरात आपले उद्योग जगतात आपले वर्चस्व जमावणारे रिलायन्स उद्योग समुहामुळं जगभरातील श्रीमंतांच्या यादीत विराजमान होणारे मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला धमकी मिळाल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी अनेकदा समोर आहे. मुकेश अंबानी व कुटुंबियांना’ पुढील तीन तासांत संपवण्याची धमकी देणारे’ काही फोन आल्यामुळं देशात एकच चर्चा आणि खळबळ उडाली आहे.

Advertisement

रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या लँडलाईनवर हा फोन आल्याचं समजत आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांचे नाव घेऊन ही धमकी दिली. या फोननंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. डी. बी मार्ग पोलीस स्टेशन इथं ते तक्रार दाखल करणार असल्याचं समजतंय. हे धमकीचे फोन करणारी व्यक्ती मनोरुग्ण असल्याचा प्राथमिक अंदाजही आता व्यक्त केला जात आहे. तरी अद्याप पोलीस चौकशीनंतर सर्व लवकरच स्पष्ट होणार आहे.

धमकी सत्र सुरूच…!

Advertisement

हॅरी पॉटर फेम लेखिका जे.के. रोलिंग यांना नुकतीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ‘काळजी करू नका, पुढचा नंबर तुमचा आहे’ अशी त्यांना धमकी मिळाली होती. दरम्यान प्रसिद्ध लेखक सलमान रुश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. हल्ला करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
जगप्रसिद्ध लेखिका जे के रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याच्या आधी रश्दी यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी ट्वीट केले होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement