SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

देशातील 1082 पोलिस कर्मचाऱ्यांना पदके बहाल, महाराष्ट्राला किती पदके..?

देशाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शौर्य, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी देशभरातील 1082 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झाली. यामध्ये महाराष्ट्रातील पोलिसांचा उल्लेखनीय सेवेसाठी तीन राष्ट्रपती पदके, 42 शौर्य पदके व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 39 पदके असा बहुमान मिळाला आहे.

देशभरातील पदके जाहीर झालेल्या एकूण 1082 अधिकाऱ्यांपैकी 87 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 347 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि 648 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

Advertisement

राज्यातील महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदके मिळाले असंल्याची माहीती आहे. त्यात सुनील कोल्हे (सहआयुक्त, राज्य गुप्तचर विभाग, कुलाबा), प्रदीप कन्नलू (सहायक आयुक्त, वायरलेस विभाग, ठाणे), मनोहर धनावडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ओशिवरा पोलीस ठाणे, मुंबई) यांचा समावेश आहे.

तर महाराष्ट्रातील पोलीस जवानांमध्ये माहूरदार परांजने, राजरत्न खैरनार, राजू कांडो, अविनाश कुमरे, संदीप भांड, मोतीराम माडवी, दामोदर चिंतुरी, राजकुमार भालावी, सागर मूल्लेवार, शंकर माडवी, रमेश असम, महेश सयम, साईकृपा मिरकुटे, रत्नाय्या गोरगुंडा, मनीष कलवानिया, भाऊसाहेब ढोले, संदीप मंडलिक, दयानंद महादेश्‍वर, जीवन उसेंडी, राजेंद्र माडवी, विलास पाडा, मनोज इसकापे, समीर शेख, मनोज गजमवार, अशोक माजी, देवेंद्र पखमोडे, हर्षल जाधव, स्वर्गीय जगदेव मांडवी, सेवाक्रम माडवी, सुभाष गोमले, रोहित गोमले, योगीराज जाधव, धनाजी होनमाने, दसरू कुरसामी, दीपक विडपी, सुरज गंजीवार, दिवंगत किशोर अत्राम, गजानन अत्राम, योगेश्‍वर सदमेक, अंकुश खंडाळे यांचा समावेश आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रपतींनी विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके खालील रेल्वे पोलीस दल आणि रेल्वे पोलीस सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना पदके जाहीर केली गेली आहेत.

Advertisement

अग्निशमन दलातील सेवेसाठी महाराष्ट्रातील किशोर घाडीगावकर,सागर खोपडे, विशाल विश्वासराव, दीपक जाधव, संजय गायकवाड,गणेश चौधरी,संजय निकम यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहेत तर गृह रक्षक आणि नागरी संरक्षण पदक महाराष्ट्रातून राम पिंजरकर यांना बहाल करण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement