SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्ही घरावर तिरंगा लावलाय? मग प्रमाणपत्र ‘असं’ करा डाऊनलोड..

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत जर तुम्हीही तुमच्या घराच्या छतावर तिरंगा फडकवत असाल तर सोप्या स्टेप्समध्ये प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे याबद्दल माहिती सांगणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून देशभरात ‘हर घर तिरंगा अभियान’ साजरा करण्यात येत आहे. ज्या अंतर्गत प्रत्येक ठिकाणी घरोघरी तिरंगा फडकवत आहेत.

भारतात 22 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरू केले होते. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान पंतप्रधान मोदींनी लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले होते. या अभियानांतर्गत नागरिकांना स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी घराच्या छतावर राष्ट्रध्वज फडकावण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. ज्यांनी त्यांच्या छतावर राष्ट्रध्वज फडकवला आहे ते त्याचे प्रमाणपत्र देखील डाउनलोड करू शकतात.

Advertisement

प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी https://amritmahotsav.nic.in/har-ghar-tiranga.htm या वेबसाईटवर जा.

तुमचे नाव आणि मोबाईल नंबरसह प्रोफाइल पिक्चर उपलब्ध करून द्या

Advertisement

मग येथे तुमच्या Google खात्याने लॉग इन करा. यानंतर तुम्हाला तुमच्या लोकेशनला सुरू करावे लागेल.

ध्वज तुमच्या लोकेशनवर पिन करा. यानंतर तुमच्या स्क्रीनवर प्रमाणपत्र दिसेल.

Advertisement

तुम्ही येथे क्लिक करून हे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement