SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता फोनवर ‘हॅलो’ नाही तर ‘हे’ बोलायचं..?

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित यापुढे महाराष्ट्रातील सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवर संभाषणाला सुरुवात करताना ‘हॅलो’ म्हणण्याऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावं, अशी सूचना महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

सविस्तर माहीती अशी की, काल (दि. 14 ऑगस्ट 2022) राज्यातील मंत्रिमंडळाचं खातेवाटप करण्यात आलं. त्यात अनेकांना मंत्रीपदं देण्यात आली. सध्या देशभरात स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं. सुधीर मुनगंटीवार यांना सांस्कृतिक कार्य विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली.

Advertisement

राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला असून या खातेवाटपात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे राज्याच्या सांस्कृतीक मंत्रालयाचा भार सोपविण्यात आला आहे. सांस्‍कृतिक खात्‍याची जबाबदारी येताच “स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पुर्वसंध्‍येला राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आता हॅलो ऐवजी आता वंदे मातरम असं म्हणावं लागणार असल्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल”, अशी राज्य सरकारच्या ट्विटर अकाऊंटवरून माहीती देण्यात आली आहे.

शासन निर्णय लवकरच…

Advertisement

भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्‍द त्‍यागत आहोत. त्‍याऐवजी शासकीय कार्यालयांमध्‍ये यापुढे आपण ‘हॅलोऐवजी वंदे मातरम्’ म्‍हणत संभाषण सुरू करणार आहोत. 18 व्या शतकामध्ये दुरध्वनीच्या माध्यमातून सुरूवात हॅलो म्हणून व्हायची. आपल्या सर्वांसाठी वंदे मातरम हे उत्साह वाढवणारे शब्द आहेत. वंदे मातरम हे पद्य नाही, गीत नाही तर ऊर्जा वाढवणारे शब्द असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे”, असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं असून सांस्‍कृतिक कार्यविभागातर्फे लवकरच तसा अधिकृत शासन निर्णय काढण्यात येईल, असंही ते म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement