SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : विनायक मेटे यांचे अपघाती निधन, ड्रायव्हरचा धक्कादायक आरोप…!!

राज्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे आज (ता. 14) सकाळी अपघाती निधन झालं आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. उपचारादरम्यान मेटे यांचे निधन झाले..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आरक्षणाच्या विषयावर बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आपल्या काही कार्यकर्त्यांसह विनायक मेटे हे काल (शनिवारी) रात्रीच मुंबईकडे निघाले होते.. बीडमध्ये आयोजित विविध कार्यक्रम रद्द करून ते मुंबईला जात होते.

Advertisement

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खोपली येथल्या बातम बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. त्यात मेटे हे गंभीर जखमी झाले होते.. मात्र, अपघातानंतर तासभर त्यांना कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप त्यांच्या ड्रायव्हरने केला आहे.. त्यानंतर त्यांच्यावर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात क्रिटीकेयर युनिटमध्ये उपचार करण्यात आले..

उपचारदरम्यान मेटे यांची प्रकृती खालावत गेली व अखेर आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र, गाडीत काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, हा अपघात झाल्याचे समोर येत आहे. कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती डोंगराच्या कपारीला धडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Advertisement

अपघातात चालक सुखरूप आहे. कारच्या डाव्या बाजूला पुढे अंगरक्षक पोलिस, तर मागे विनायक मेटे बसले होते. अपघातग्रस्त कारच्या डाव्या बाजूला जास्त क्षती पोहोचली. त्याच बाजूला मेटे बसलेले होते. अपघाताची माहिती समजताच, देवदूत रेस्क्यू यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था आणि महामार्ग पोलिस घटनास्थळी हजर झाले. अंगरक्षकावर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयातील अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी मोठा लढा दिला.. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलने केली.. सत्ताधाऱ्यांना त्यांनी अक्षरक्ष: सळो की पळो करुन सोडले होते.. मराठी आरक्षणासाठी लढणारी बुलंद तोफ हरपल्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जातेय.. विविध क्षेत्रातील लाेकांनी मेटे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे..

Advertisement

 

Advertisement