SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ग्राहकांची ‘या’ इलेक्ट्रिक कारला सर्वाधिक पसंती, तुमच्याकडे आहे का ‘ही’ कार..?

सततच्या इंधन दरवाढीमुळे भारतात गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.. त्यामुळे भारतीय वाहन बाजारात इलेक्ट्रिक वाहनांचं सेगमेंट विस्तारत आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहून नवनवीन ऑटो कंपन्या भारतात त्यांची इलेक्ट्रिक वाहने लाँच करीत आहेत.

तुमचाही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.. सध्या इलेक्ट्रीक सेगमेंटमध्ये रोज नवी कार येत असल्याने नेमकी कोणती कार खरेदी करावी, असा प्रश्न पडतो.. चला तर भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टाॅप -10 कार्सबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

टाॅप-10 इलेक्ट्रिक कार

‘टाटा’ आघाडीवर
जुलै-2022 मधील वाहनांच्या विक्रीची आकडेवारी नुकतीच समोर आली. त्यानुसार ‘टाटा नेक्सॉन ईव्ही’ (Tata Nexon EV) ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार ठरलीय. दुसऱ्या क्रमांकावरही ‘टाटा’चीच कार आहे. तिचं नाव आहे ‘टाटा टिगॉर ईव्ही’.. ‘टाटा मोटर्स’ने जुलैमध्ये ‘टाटा नेक्साॅन’ व ‘टिगाॅर’ या दोन कार्सच्या एकूण 2878 युनिट्सची विक्री केलीय.

Advertisement

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ‘एमजी झेडएस’ ईव्ही कार.. कंपनीने या कारचे 263 युनिट्स जुलैमध्ये विकले आहेत. ‘ह्युंदाई कोना’ इलेक्ट्रिक कारचे 58 युनिट्स विकले गेले आहेत. इलेक्ट्रिक ‘एमपीव्ही’ कार बीवायडी ई-6 (BYD E6) चे एकूण 44 युनिट्स विकले गेले आहेत. ‘महिंद्रा’ची किफायतशीर ‘सेडान महिंद्रा ई-वरीटो’चे (Mahindra e-Verito) कंपनीने 26 युनिट्स विकून पाचवा नंबर मिळवला आहे..

लग्झरियस कार्सना पसंती

Advertisement

भारतात अनेक लग्झरियस इलेक्ट्रिक कार्सनाही ग्राहकांची पसंती मिळताना दिसते आहे.. जुलैमध्ये या सेगमेंटमध्ये ‘ऑडी ई-ट्रॉन’चे (Audi e-Tron) 7 युनिट्स विकले गेले. ‘पोर्शे टायकन’ (Porsche Taycan) या यादीत सातव्या नंबरवर आहे. कंपनीने या मॉडेलचे 7 युनिट्स विकले.

सर्वाधिक विकल्या गेलेल्या कारच्या यादीत आठव्या नंबरवर ‘बीएमडब्ल्यू आयएक्स’ आणि ‘आय-4’ या कार आहेत. कंपनीने या कार्सचे एकूण 5 युनिट्स विकले. नंतर ‘मर्सिडीज ईक्यूसी’चे (Mercedes EQC) ही 2 युनिट्स विकले गेले आहेत. यांसह इतर कंपन्यांच्या 5 इलेक्ट्रिक कार विकल्या गेल्याचे आकडेवारी सांगते..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement