SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): तुम्ही स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. व्यापार्‍यांसाठी दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीने अधिकारी प्रभावित होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. घरगुती कामानिमित्त प्रवास घडेल. सामुदायिक गोष्टींमध्ये अडकू नका.

वृषभ (Taurus): कठोर परिश्रमाने अवघड कामेही सहज पूर्ण होतील. किरकोळ व्यावसायिक अडचणी दूर होतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. व्यवसायात चांगला फायदा होईल. आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील. अधिकार्‍यांकडून कामे करून घ्याल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. आज आपल्या सहकार्‍यांशी सलोख्याने वागावे.

Advertisement

मिथुन (Gemini) : आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. व्यापार व व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील. मुलांचा खोडकरपणा वाढीस लागेल. जमिनीच्या व्यवहारातून लाभ मिळवाल. एखाद्या मित्राचे प्रशंसनीय सहकार्य मिळेल. तुमचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा सुधारेल. बौद्धिक हटवादीपणा दाखवाल.

कर्क (Cancer) : भावनिक गोंधळ वाढवू नका. आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा. सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. व्यावसायिक वाढीसाठी नवीन धोरण आखाल. तुमच्या विरोधात काही व्यक्ती वागू शकतात.

Advertisement

सिंह (Leo) : सौहार्दपूर्ण संबंध राहतील. आज तुम्ही कुणाला सल्ला दिलात तर अन्य कुणाचा सल्ला घेण्याचीही तयारी ठेवा. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल. गुंतवणुकीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. आज तुमचे आरोग्य चांगले राहील. जवळच्या लोकांच्या भेटीने खुश व्हाल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल.

कन्या (Virgo) : कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आज कामात फार मोठे बादल करू नका. नातेवाईकांची मदत घेता येईल. थट्टेखोर स्वभावामुळे लोकप्रिय व्हाल. जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल. कमिशनच्या कामातून लाभ मिळवाल. उद्दीष्ट ठरवून ठेवा. आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. आरोग्य सामान्य राहील.

Advertisement

तुळ (Libra) : आज तुम्ही तुमचे विचार आणि वागणूक संतुलित ठेवा. जोडीदाराशी वादविवाद टाळा. घरगुती प्रश्नांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. यथायोग्य विचार करून कार्य करा. अडचणी येण्याची शक्यता आहे. काही राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषदायक राहील. रागाला आवर घालावी लागेल. आज जोडीदाराचा हट्ट पुरवाल.

वृश्‍चिक (Scorpio) : व्यापाऱ्यांसाठी परिस्थिती साधारण. अपत्यांचा सहयोग मिळेल. नशिबाच्या मदतीने तुम्ही काही मोठे यश मिळवू शकता. तुमच्या-वरील कामाचा बोजा एखाद्यासोबत शेअर केल्याने तुम्हाला थोडे हलके वाटेल. संयम बाळगावा लागेल. आज व्यापारी वर्गाला विशेषत: चांगले परिणाम मिळतील. धन आणि लाभाचे योग येतील.

Advertisement

धनु (Sagittarius) : भाव बघून दागिने व कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. तुमच्यासमोर एखादे आव्हान येऊ शकते. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. कौटुंबिक आनंद निर्माण होईल, आज तुम्ही आनंदी असाल.

मकर (Capricorn) : व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. आज खूप आनंद होईल. कौटुंबिक सुख अपेक्षेप्रमाणे राहणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्यासमोर एखादे आव्हान येऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. ऑफिसात आपल्या क्रोधावर संयम ठेवा.

Advertisement

कुंभ (Aquarious) : यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शक्यता आहे. आज मूड चांगला राहणार आहे, कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. शत्रू वर्गापासून दूर राहा. आपली योजना बनवण्यात सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तुम्ही तुमच्या हुशारीने तुमचे काम आज नक्की यशस्वी कराल.

मीन (Pisces) : एखाद्या चांगल्या ठिकाणी भेट देण्याची योजना आखू शकता. महिलांचा दिवस घरातील कामात जाईल. दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. सहकार्‍यांबरोबर वादाची स्थिती टाळा. आरोग्य उत्तम राहील. सरकारी विभागात काम करणाऱ्या लोकांना ट्रान्सफर लेटर मिळू शकेल. वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

Advertisement