SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘पीओपी’ मूर्तीवरील बंदीबाबत मोठा निर्णय, नागपूर खंडपीठात सुनावणी..!!

गणेश भक्तांसाठी महत्वाची बातमी आहे.. येत्या 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे.. कोरोनाचे संकट कमी झाल्याने यंदाच्या गणेशोत्सवावर कोणतीही बंधने नसतील, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने केली होती. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव दणक्यात साजरा केला जाणार, हे नक्की..!!

दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आला, की ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ अर्थात ‘पीओपी’ मूर्तींची चर्चा सुरु होते.. ‘पीओपी’ मूर्ती पाण्यात विरघळत नाही.. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून ठोस भूमिका घेतली जात नाही.. त्यामुळे देवी-देवतांच्या ‘पीओपी’ मूर्तींच्या विक्रीबाबत राज्यात स्थानिक प्रशासन वेगवेगळी भूमिका घेते. कोणी मोकळीक देते, तर कोणी मनाई करते.. त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले असते..

Advertisement

‘पीओपी’ मूर्तीबाबत असलेल्या गोंधळामुळे 2021 मध्ये मुंबई हायकोर्टाने स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. देवी-देवतांच्या ‘पीओपी’ मूर्ती पाण्यात लवकर विसर्जित होत नाही.. त्यामुळे देवी-देवतांची विटंबणा होते.. शिवाय, ‘पीओपी’ मूर्ती तयार करताना वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळे जलस्त्रोत प्रदूषित होतात. असं असतानाही आतापर्यंत राज्य सरकारने याबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. ही अतिशय गंभीर बाब असल्याचे खंडपीठाने गेल्या सुनावणीदरम्यान सरकारला सुनावले होते.

राज्य सरकारची भूमिका..

Advertisement

दरम्यान, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्यासमोर शुक्रवारी (ता. 12) या याचिकेवर सुनावणी झाली.. त्यावेळी राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली..

येत्या 31 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. त्यामुळे देवी-देवतांच्या ‘पीओपी’ मूर्तींवरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी येत्या 20 ऑगस्टपर्यंत तात्पुरते धोरण तयार केले जाईल.. तसेच कायमस्वरुपी धोरणाला 3 महिन्यांत अंतिम स्वरुप देण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारतर्फे नागपूर खंडपीठाला देण्यात आली..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement